विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात; नीट, जेईई परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे कसे मिळणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना पडला आहे.

यवतमाळ - प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असली तरी नवीन अभ्यासक्रमाच्या अकरावीच्या पुस्तकांना मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. अकरावीची कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पुस्तकांना जुलै-ऑगस्ट उजाडणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे कसे मिळणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना पडला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार चालू शैक्षणिक सत्रापासून इयत्ता दुसरी आणिअकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. सध्या दुसरीची सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली असून अकरावीची मात्र अद्याप बाजारात आलेली नाहीत. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात येण्यास जुलै किंवा ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे. ’सीबीएसई’च्या धर्तीवर 2013 पासून शालेय अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याची जबाबदारी बालभारती पाठ्यपुस्तके मंडळाची आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पाठ्यपुस्तकांची छपाई रेंगाळली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन पाठ्यपुस्तके बाजारात केव्हा येतील? याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाला शंका आहे. सध्या अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनंतर अकरावीचे वर्ग सुरू होण्यास ऑगस्ट महिना उजाडतो.

त्यामुळे सध्यातरी अकरावीच्या पुस्तकांची विद्यार्थ्यांना घाई नाही. त्यातच अकरावीच्या पाठ्यपुस्तकांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा कयास आहे. मात्र हे समर्थन विद्यार्थी तसेच शिक्षक व पालकांना मान्य नाही. कला वाणिज्य पेक्षा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची   अधिक प्रतीक्षा आहे. नीट, जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू झालेले आहेत. त्यांना पुस्तकांची गरज आहे. परंतु आणखी काही दिवस पुस्तकांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

यासंदर्भात पाठ्यपुस्तक मंडळही फारसे गंभीर दिसत नाही. पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षक विद्यार्थ्यांना कोणते धडे देणार? अभ्यासक्रमाचे कोणते घटक शिकविणार? ऑगस्टमध्ये पुस्तके उपलब्ध होत असतील तर विद्यार्थ्यांच्या होणार्‍या नुकसानाला जबाबदार कोण? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यावर शिक्षण विभागातील अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. एकूणच पाठ्यपुस्तक पुनर्रचना नियोजनात झालेल्या ढीसाळघाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.खासगी पब्लिशर्नना पुस्ते प्रकाशित करू देत नाही.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कोणीही पुस्तके बाजारपेठेत आणू नये अशी अट घाटण्यात आले. पाठ्यपुस्तके महामंडळाकडून. त्यामुळे खासगी पब्लिशर्न यांनी पुस्तके प्रकाशित केली नाही. कारवाईची धमकी दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ’अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचा अभ्यासक्रम बदलला आहे.

नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे अभ्यास घटक कसे शिकवावे, हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. त्यातच अकरावी विज्ञान विद्यार्थ्यांना ’नीट’ आणि ’जेईई’ची तयारी करावी लागत असल्यामुळे पाठ्यपुस्तके मंडळाने त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.-प्रा. प्रल्हाद दवणे,
उपप्राचार्य, फुलसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालय पुसद

एनसीआरटीचा सिलॅबस स्टेट बोर्डसाठी येणार आहे. तसेच परीक्षा पद्धतीतही
बदल करण्यात आला आहे. अद्याप अकरावीची पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे कोणत्या दिशेने शिकवावे, हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. नवीनअभ्यासक्रमामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.
-प्रा. दिलीप बंब,राठी क्लासेस प्रा. लि., यवतमाळ

अभ्यासक्रम बदलला असेल तरी थोडाफार बदल होत असतो. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यामध्ये फारसा बदल होत नाही. सिलॅबसमध्ये बदल झाला आहे. नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तके उद्यापर्यंत येतील.
प्रकाश भूमकाळे,प्राचार्य, स्वामी विवेकानंद

एनसीआरटीचा सिलॅबस स्टेट बोर्डसाठी येणार आहे. अद्याप पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणत्या दिशेने शिकवावे, हा प्रश्‍न शिक्षकांसमोरआहे. तर, विद्यार्थी नवीन अभ्यासक्रम येणार असल्यामुळे संभ्रमात आहेत. परीक्षा पद्धतीतही बदल सुचविण्यात आले आहे. परंतु, त्यासंदर्भात अधिसूचना देण्यात आलेली नाही. एकूण अकरावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्र राज्य पुस्तक महामंडळ
-प्रा. दिलीप बंब, सेवानिवृत्त शिक्षक, राठी क्लासेस, यवतमाळ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News