पनवेल नशेच्या विळख्यात...! म्याऊं म्याऊं, बटन, गांजा, हुक्का पार्लर व्यवसाय तेजीत

हर्षल भदाणे पाटील
Wednesday, 30 January 2019

      पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात म्याऊं म्याऊं, बटन, गांजा, हुक्का पार्लरचा व्यवसाय वाढत चालला आहे. हे सर्व व्यावसाय बेकायदेशीररित्या चालविले जात आहेत. त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हुक्का पिण्याच्या नावाखाली गांजाच्या अंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तरूणपिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. हुक्का पॉटमध्ये फ्लेवर तंबाखू बरोबर गांजा जाळून त्याचे व्यसन केले जात आहे.

      पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात म्याऊं म्याऊं, बटन, गांजा, हुक्का पार्लरचा व्यवसाय वाढत चालला आहे. हे सर्व व्यावसाय बेकायदेशीररित्या चालविले जात आहेत. त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हुक्का पिण्याच्या नावाखाली गांजाच्या अंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तरूणपिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. हुक्का पॉटमध्ये फ्लेवर तंबाखू बरोबर गांजा जाळून त्याचे व्यसन केले जात आहे. या हुक्क्याच्या धुरामध्ये तरुणाई हरवत चालली असून यापुढे हुक्क्याची नशा जर कमी पडू लागली तर भविष्यात आजची तरुण पिढी यापेक्षा घातक नशेच्या आहारी जाण्याची दाट शक्यता आहे .

पश्‍चिम बंगाल, काश्मीर, राजस्थान इतकेच नव्हे तर बाजूच्या मुंबई-पुणे भागातूनही गांजाची मोठी आवक अंमली पदार्थाच्या बाजारात होताना दिसत आहे. यातच हुक्का व्यवसायाचा विस्तार उच्चभ्रू सोसायटीमधील सदनिका आणि खासगी बंगल्यामध्ये झाला आहे. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांची हुक्का पार्लर चालकांशी आर्थिक संबंध असल्याने पनवेल परिसरात हुक्का पार्लरचे अनेक ठिकाणी पेव फुटले आहे. यातही नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजे या सिडको वसाहतीमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची चर्चा आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे तसेच पोलिसांकडे आलेल्या तक्रारींमुळे सोसायट्यांतील दुकानांमध्ये सुरू असलेला हुक्का व्यवसाय यापूर्वी बंद करावी लागली आहेत, तर काही ठिकाणी बेकायदा हुक्का पार्लरला स्थानिकांचा विरोध असल्याने सार्वजनिक जागेतून बंद केला आहे.

मात्र पोलिसांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी हा व्यवसाय उच्चभ्रू सोसायट्यांतील सदनिका तसेच बंगल्यांमध्ये शिफ्ट केला आहे. येथे परिचयातील ग्राहकांना बोलावून त्यांच्याकडून ठराविक तासासाठी ठराविक रक्कम घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर काही लिव्ह-इनमध्ये राहणारे कपलही भाडेतत्वावर हा व्यवसाय करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्रा कायद्यानुसार गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे, मात्र सिगारेट विक्रीस बंदी नाही, हुक्का हा सिगारेट ऍक्टखाली येतो. यामुळे त्याची विक्री पान टपरीवाले करतात. कायद्यानुसार सिगारेटचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करता येत नाही. केल्यास 200 रुपये दंड भरावा लागतो. हाच दंडाचा कायदा हुक्का सार्वजनिक ठिकाणी ओढताना लागू होतो. दुसरे म्हणजे एफडीएच्या कायद्यात फक्त अन्न पदार्थ व्यवसायालाच परवानगी देण्याची तरतूद आहे. यामुळे हुक्का पार्लरला परवानगीची तरतूद नाही.

किशोरवयीन मुले हुक्का ओढण्याच्या आहारी गेल्याचे आढळत आहे. अगदी 16 ते 17 वर्षाची मुलेही हुक्का ओढताना सर्रास दिसत आहेत. यातूनच पुढे इतर अंमली पदार्थांचे व्यसनही जडते. हुक्क्यामध्ये 50 पेक्षा जास्त फ्लेवर्स उपलब्ध आहेत. या फ्लेवर्समुळे हे बिनवासाचे व्यसन समजले जाते. यामुळे व्यसन केलेले पालकांनाही कळत नाही. हुक्काचे फ्लेवर्स आणि त्यासाठीचे साहित्य शहरांतील पान टपर्‍रांवर सहज विकले जात आहे. यामुळे हुक्का पार्लरमध्ये जाण्याची गरजही राहिलेली नाही. शिक्षण व नोकरीनिमित्त एकटे राहणाऱ्या तरुणांच्या सदनिकांमध्येही हुक्काचे साहित्य आणून व्यसन पुरे केले जाते. हुक्का पार्लरसंदर्भात कायदा अपुरा असल्याने पोलिसांना कारवाई करताना काही प्रमाणात मर्यादा येतात. एखाद्या ठिकाणी 30 पेक्षा जास्त खुर्च्या टाकून हुक्का विक्री करता येते. फक्त तेथे स्मोकिंग झोन/चेंबर करावे लागते. तीसच्या आत खुर्च्या असतील तर हुक्का विक्री करण्यास परवानगी नाही, विशेष म्हणजे हुक्का पार्लर सुरू करण्यास कोणतीच लायसन्सनींग ऍथोरिटी नसल्याचे पोलीस दलातील सुत्रांचे म्हणणे आहे.

ऑनलाइन मार्केटमध्येही उपलब्ध...
ऑनलाइन मिळणारे अंमली पदार्थ ही मुंबई पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. सांकेतिक भाषेत त्याचे व्यवहार चालतात. त्यासाठी प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी कोक, गांजासाठी वीड, हशीशसाठी हसत, एमडीसाठी बुक या सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात येतो.  हुक्काचे विविध फ्लेवर आणि त्यासाठी लागणारे साहित्य (चारकोल, पॉट, पेपर) ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध आहे. आघाडीच्या ऑनलाइन कंपन्या अगदी सवलतीच्या दरात विविध प्रकारचे हुक्काचे फ्लेवर्स आणि आकर्षक पॉट विकत आहे. हुक्काच्या दहा फ्लेवर्सेचे पॅकही अगदी 299 पासून 999 रुपयांपर्यत उपलब्ध आहे, तर हुक्काप्रेमींकडून सर्वाधिक मागणी ही ऑरेंज किफ, लेव्हेंडर मिंट, रुट बिअर, सारट्रस आईस, स्टोन मिंट, पिच, पिअर चिल, व्हाईट गमी बिअर या फ्लेवरला सर्वाधिक मागणी आहे.

गोगो सिगरेटची सर्रास विक्री......
आजची काही तरुण पिढी नशेचे नव नवीन प्रकार शोधत आहे. आजच्या तरुण पिढीची नशेची तलप बघून या धंद्यात सक्रिय असणारे मागणी तसा पुरवठा या प्रमाणे नवीन नशेचे ट्रेंड बाजारात उपलब्ध करून देत आहेत. अशातच आता काही पान टपरीवर गोगो नावाची गांजा भरलेली सिगारेट अवघ्या दहा रुपयाला राजरोस विकत आहे. पनवेल बस स्थानकाच्या आजूबाजूच्या पान टपरीवर हि सिगारेट मिळत असून शाळेतील विद्याथी तसेच बस, रिक्षा चालक तसेच झोपडपट्टीतील काही जण या गांजा भरलेल्रा गोगो सिगारेट घेऊन नशा करून स्वतः चा नाश करत असल्याचे दिसत आहे.  

पनवेल पोलिसांनी केला गांजा आणि चरस हस्तगत
पनवेल मध्ये १०८ किलो गांजा आणि सुमारे २ किलो चरस गस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाची हि तिसरी मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.एकुण 47,01,000/-रू. किंमतीचा 108 किलो वजनाचा गांजा आणि 2 किलो 245 ग्रॅम वजनाचे चरस हे अंमली पदार्थ मिळून आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News