असे झाले पाणीदार गाव

बा. पु. गायखर, लोहा
Thursday, 7 March 2019

राज्याचे सह सचिव असताना पारवा (ता. परभणी) हे गाव दत्तक घेऊन ग्रामविकासात हे गाव राज्यात पहिले आल्याते ते अभिमानाने सांगतात. गावच्या गाव जलसंवर्धन, स्वच्छता अभियानात लोकसहभागात आली. रायवाडी (ता. लोहा) ही जन्मभूमी. गाव पाणीदार करण्यासाठी पहिली बैठक स्मशानभूमीत घेतली. बघता बघता रायवाडी पाणीदार बनले. दीडशे विहिरींची पाणी पातळी वाढली. वनीकरण वाढले. कुऱ्हाडबंदी झाली. गावाला बक्षीस मिळाले. रंगभूमी आणि रूपेरी पडद्यातून खुलत नि खुलवत गेलो. पाणी बचतीतून सकारात्मक सामाजिक बदल घडतो आहे. हे सगळ करण्यासाठी स्मशानभूमीतून मंदिराच्या कळसाकडे जाणारा सरधोपट मार्ग अवलंबला लागतो. त्यातूनच पाणीदार गाव होण्याचे जनआंदोलन उभं राहू शकतं. 

मराठी चित्रपटाचे सत्तरचे दशक मोठे स्थित्यंतराचे होते. या काळात हिंदी सिनेमातही बॉलीवूडचे सुकाणू येत होते. नव्वदच्या दशकात मराठी चित्रपट ‘झुंज तुझी माझी’ यात महत्त्वाची भूमिका केली. तीत नायिका अश्विनी भावे, डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ, निळू फुले या दिग्गजांसोबत कसदार अभिनय केला.

रंगभूमी हा माझ्यासाठी इंटरेस्टिंग असायंच. व्यंकटेश माडगूळकरांच ‘पती गेले गं काठेवाडी’ यात मी स्वत:ला झोकून दिलं. पुढे लोककलांचे जतन होण्यासाठी सनदी अधिकारी असताना माळेगाव यात्रेला प्रशासकीय खर्चातून नवसंजीवनी दिली. लोककलेतील कलावंतांना मान- सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी अखंडपणे काम करत असल्याचे मोठ्या अभिमानाने मराठी चित्रपट अभिनेते तथा सनदी अधिकारी अनिल (एकनाथ) मोरे सांगत होते. 

नवख्या तरुणांनी अभिनयाकडे वळतांना पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करावे. टॅलेंट जपावं लागतं. अभिनयाचा कस अंगात उतरावा लागतो. तो ओढून ताणून करता येत नाही, असे ते युवकांना मार्गदर्शन करतांना सांगतात. आगामी काळात राजकारण आणि राजकारणापेक्षा समाजबांधणी महत्त्वाची वाटते. पुढील जलसंवर्धन आणि लोकसहभाग यासाठी आयुष्य घालवायचे आहे. लहानग्या वयापासून वाचनाची पोषक पार्श्वभूमी माझ्यात रुजली.

गढूळलेले वातावरण निमिषार्धात नितळ होण्यासाठी एकमेकांत संवाद होणं गरजेचं आहे. व्यक्त होणं ही मूलभूत गरज ‘नाही रे’ वाल्यांसाठी देऊ केली तर सामाजिक, वैचारिक व आर्थिक विकास झपाट्याने होतो, हे मी अनुभवातून सांगू शकतो. माझ्या दृष्टीने लोकानंद प्रक्रियेचा एक भाग असतो. या बळावर दीड हजार शाळेचे प्रबोधन केलं. खरं तर सर्वांगीण शिक्षणामध्ये विषयाच्या ज्ञानाबरोबर संस्कार कौशल्य विकासाचा मूल घडण्याचा एक भाग आहे. संस्कार हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे आहेत. बीड येथे जिल्हा कोषागार असतांनाची एक गोष्ट आठवते. सामाजिक संदर्भ देतांना त्यांच्या ओळी अशा : 

ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे।
पुतळ्यांता नाही मर्द हो, हा पुस्तकांचा काळ आहे...

मी नेहमी पुण्याला गेलं की, अप्पा बळवंत चौकात नेमाने जायचो. प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांचं छोटसं ‘प्रतिज्ञा’तील आठ ओळी आणि त्याचा अर्थ खुबीने मांडला होता. ही एक हजार पुस्तकांच्या प्रती मला विकत घ्यायच्या होत्या. एवढी संख्या नव्हती. नंतर साधना प्रकाशनाकडे गेलो, तिथंही या प्रती मिळाल्या नाहीत. लेखक यदुनाथ थत्ते यांना गाठले. त्यांना माझ्या मनीचे भाव व्यक्त केले. लेखक यदुनाथ थत्ते म्हणाले, ‘‘एवढी पुस्तकं विकत घेणारा व्यक्ती मला माझ्या उभ्या आयुष्यात कधी भेटला नाही.’’ त्यांनी मला तब्बल एक हजार ५०० पुस्तकं दिली. हजार शाळेच्या मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रबोधन शिबिर घेतलं. या पुस्तकावर आधारीत वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका काढली. जिल्हाभर या परीक्षेला उदंड प्रतिसाद भेटला. या अभियानासाठी तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची मोलाची मदत मिळाली.

संवाद सहज असला तरी त्यामागील प्रेरणा तितकीच उत्स्फूर्त असावी लागते. माणूस केंद्रस्थानी ठेवून निसर्गातील दाखले दिल्याने जवळपास सव्वा दोन हजार मी केलेली भाषणं लोकांच्या रक्तात भिनली. आपला देश उत्सवप्रिय आहे. राज्याचे सह सचिव असतांना पारवा (ता. परभणी) हे गाव दत्तक घेऊन ग्रामविकासात हे गाव राज्यात पहिले आल्याते ते अभिमानाने सांगतात. गावंच्या गावं जलसंवर्धन, स्वच्छता अभियानात लोकसहभागात आली. रायवाडी (ता. लोहा) ही जन्मभूमी. 

गाव पाणीदार करण्यासाठी पहिली बैठक स्मशानभूमीत घेतली. बघता बघता रायवाडी पाणीदार बनले. दीडशे विहिरींची पाणी पातळी वाढली. वनीकरण वाढले. कुऱ्हाडबंदी झाली. गावाला बक्षीस मिळाले. रंगभूमी आणि रूपेरी पडदा यातून खुलत नि खुलवत गेलो. पाणी बचतीतून सकारात्मक सामाजिक बदल घडतो आहे. हे सगळं करण्यासाठी स्मशानभूमीतून मंदिराच्या कळसाकडे जाणारा सरधोपट मार्ग अवलंबावा लागतो. त्यातूनच पाणीदार गावं होण्याचे जनआंदोलन उभं राहू शकतं. हे बदलतं स्वरूप अनुभवणं हा आनंददायी अनुभव असतो. असं ठणकावून समाजसेवेतील जननायक रंगकर्मी अनिल उर्फ एकनाथ मोरे सांगत होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News