मी नम्रपणे पराभव स्विकारते - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 October 2019

परळी - महाराष्ट्रात गाजलेली सगळ्यात मोठी लढत म्हणजे परळ मतदान संघाची निवडणूक होय. हा मतदार संघ राष्ट्रवादीसह भाजपालाही प्रतिष्ठेचा होता, म्हणून संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. परळी मतदार संघामध्ये पीए विरुध्द डीएम म्हणजेच पंकजा मुंडे विरुध्द धनंजय मुंडे अशी भावाबहिणींची लढत रंगतदार होती. 

विरोधी पक्ष नेते म्हणून कामगिरी बजावणाऱ्या धनंजय मुंडेंनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने मते मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मात्र हा पराभव मी नम्रपणे स्विकारत आहे आणि बीडच्या नागरिकांच्या मनामध्ये काय होतं याची जाणिव मला झाली आहे, असे मत व्यक्त केले आहे. 

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी शेवटच्या सभेमध्ये मतदारांना आवाहन केले होते, की या गलिच्छ राजकारणातून तुम्ही तरी मुक्त व्हा, नाहीतर मला तरी मुक्त करा आणि माझ्या मते लोकांनी  मला मुक्त केले आहे. इथून पुढे माझ्यासमोर काय वाडून ठेवलं आहे त्याची जाणीव नाही मात्र मी जनतेच्या आणि गरिबांच्या मदतीला नक्की जाईन असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. हे बोलत असताना आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहाण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. तर हा निकाल सर्वांसाठी अनाकलनिय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News