पंकज भुजबळ यांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 October 2019
  • राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ हे पिछाडीवर  आहेत.

नाशिक -   राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ हे पिछाडीवर  आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघावर पंकज भुजबळ हे सलग दोन निवडणूकीत विजयी झाले होते. यंदाची निवडणूक पंकज भुजबळ यांच्यासाठी कठीण होती.

शिवसेनेचे सुहास कांदे यांनी त्यांना प्रबळ आव्हान उभे केले होते.विधान सभा निवडणूकीच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार पंकज भुजबळ यांच्या पेक्षा ४३९९ मतांनी आघाडीवर होते.

सुहास कांदे यांना ९५५३ तर पंकज भुजबळ यांना ५१५४ मते मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदारसंघातून पराभव झाला असून शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News