पाचगणी: सुखद निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विलक्षण ठिकाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

कधी एकेकाळी निवृत्त झाल्यानंतर स्थायिक होण्यासाठी आदर्श ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी आता मुंबई व पुणे येथील सहलप्रेमींचेही आवडते ठिकाण बनलेले आहे. सह्याद्री पर्वत रांगांमधील पाच डोंगर आणि गावांच्या दरम्यान वसलेले हे ठिकाण मुंबईपासून 285 किमी दूर आहे व आपल्या आरोग्यवर्धक हवामानासाठी प्रसिद्ध आहे.

येथे आल्यानंतर सिडनी पॉईंटला अगत्याने भेट द्या, जेथून आपण धोम धरण व डेव्हिल्स किचन बघू शकता, ज्याविषयी पौराणिक कथांमध्ये म्हटले जाते की तेथे पांडवांनी काही काळ वास्तव्य केले होते व पारसी पॉईंटलाही भेट द्या, जेथून आपण कृष्णा खोऱ्याचे विहंगम दृश्य बघू शकता. पाचगणीविषयी एक रोचक बाब म्हणजे या भागाला वेढणाऱ्या पाच डोंगरांवर असलेले ज्वालामुखीचे पठार हे आशियामधले दुसरे सर्वात उंच पठार आहे आणि त्याचा क्रमांक अगदी तिबेटच्या पठारानंतर येतो.

तर मुंबईकरांनो, आता जेव्हा आपल्याला आपली पिकनिक बॅग भरून एखाद्या चित्तवेधक ठिकाणी एक दिवसासाठी किंवा विकेंडला जायचे असेल तेव्हा आमच्या या यादीमधून एखादे ठिकाण निवडा आणि एक भन्नाट व विलक्षण अनुभव घेण्यास सज्ज व्हा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News