शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘पंचसूत्री’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळा विकासाचा आराखडा सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला दिला आ

अकोला  - जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळा विकासाचा आराखडा सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. अाराख‌डाअंतर्गत पायाभूत विकास आराखडा , शाळा संचालित करण्यासाठीच्या नियामावली, पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणे, गृहभेटी अादींसह शिक्षकांच्या प्रशिक्षणांची माहिती संकलित करण्याची बाब अंतर्भूत आहे.

 जि.प.चा शैक्षणिक दर्जा खासगी शाळा, कॉन्व्हेंच्या तुलनेने अगदी सुमार आहे. शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भाैतिक सुविधा, पाेषण अाहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येते. मात्र तरीही सरकारी शाळांचा दर्जा ढासळलेला आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या सीईआेंनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पंचसूत्री कार्यक्रम आखून त्यानुसार कार्य करण्याचे आवाहन शिक्षकांना केले आहे. त्याअंतर्गत कार्यशाळेसह इतरही उपाय याेजना करण्यात येत आहेत . दरम्यान, आता  दोन  दिवसांपूर्वी विभाग प्रमुखांच्या झालेल्या आढावा बैठकीत शाळांच्या सर्वांगिण विकासाबाबत अाराखडाच तयार करण्यात आला आहेत  याबाबत सीईअाे आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. समायाेजनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सीइअाेंनी शिक्षकांना आवाहन करणारे पत्र जाहीर केले आहे.

 घरभेटीवर लक्ष देण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्येत वाढ हाेण्यासाठी घरभेटीसाठी शिक्षकांचे पथक तयार करण्यात यावे. शाळेत विज्ञान आणि गणिताच्या किटचा पुरेपूर वापर करण्यात यावा. सर्व विद्यार्थी व शिक्षकांना ओळखपत्र  देऊन ते नेहमी धारण करावे. प्रत्येक तालुक्याला एक बॅंडपथक तयार करण्यात यावे. सर्व वर्गांचे साप्ताहिक शिकवण्याचे नियाेजन करण्यात यावे, इत्यादी प्रकारचे आवाहन पत्राद्वारे सीईआेंनी केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News