उत्तराखंडमध्ये पानमसाला आणि गुटखा झाला बंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

गेल्या वर्षांपासून पान मसाला, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नाही तर पान तंबाखू खाऊन सार्वजणिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाणही तितक्याच पटीने वाढले आहे, त्यामुळे उत्तराखंड सरकारने तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्यासारखे पदार्थांवर पुर्णपणे बंदी घातली असल्याचे समजले जाते.

भारतात अजूनपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन झालेल्या मृत्यूंची आकडेवारी 1.3 दशलक्ष इतकी आहे तर 2020 सालापर्यंत ती आकडेवारी 1.5 दशलक्षापर्यंत जाण्याची भिती काही डॉक्टर तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने आता पान मसाला व गुटखा निर्मिती, साठवण, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

या बंदीमागील कारण स्पष्ट करताना उत्तराखंड सरकारने जाहीर केले आहे की, फुड सेफ्टी अॅंण्ड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया Food Safety and Standards Authority of India तंबाखू आणि निकोटीनचा तसेच मानवी शरिरासाठी घातक ठरणाऱ्या कोणत्याही उत्पादनाचा, घटक म्हणून वापर करण्यास बंदी घालण्यात येत आहे, परंतु गुटखा, पान मसाला आणि इतर बरीच उत्पादने निरनिराळ्या नावांनी विकल्या जाणाऱ्या घटकांमध्ये त्यांची उच्च सामग्री कायम आहे, त्यामुळे अनेक उत्पादक आणि विक्री करणाऱ्या लोकांनी याची सतक्रता पाळावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News