पल्लवी साकारणार ‘दुर्गाबाई’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • अभिनेत्री पल्लवी पाटलांचे  वेब दुनियेत पदार्पण
  • ‘गोंद्या आला रे आला’ या वेबसीरिजमधून लवकरच प्रेक्षकांसमोर
  • वेबसीरिजचे दिग्दर्शन अंकुर काकतकरांनी केले

अभिनेत्री पल्लवी पाटीलने ‘क्‍लासमेट’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोजर परांजपे’, ‘बॉईज २’सारखे वेगळे चित्रपट केल्यानंतर आता ती वेब दुनियेत पदार्पण करत आहे. ‘गोंद्या आला रे आला’ या वेबसीरिजमधून ती लवकर प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ही वेबसीरिज एका सत्य घटनेवर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये पल्लवी ही दामोदर चाफेकर यांची पत्नी ‘दुर्गाबाई’ साकारणार आहे. ती म्हणते, ‘चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर वेबसीरिजमध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. मी खूप आनंदी आहे, की एका सशक्त भूमिकेने माझं वेबसीरिजमध्ये पदार्पण होत आहे.’

या वेबसीरिजचे दिग्दर्शन अंकुर काकतकर यांनी केले आहे. येत्या १५ ऑगस्टला वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News