#WC2019 इंडियासोबत हारल्याने पाकिस्तानचे प्रशिक्षक करणार होते आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

मँचेस्टर - भारतासोबतची झालेली हार ही पाकिस्तानसाठी मोठी शिकवण होती. त्यानंतर पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेसोबत सामना जिंकून वर्ल्ड कपमध्ये टिकून राहण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत, मात्र या सगळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी आपलं मत मांडलं आहे की भारतासोबत पराभव झाल्यानंतर मला अक्षरश: आत्महत्या करावीशी वाटत होती.

दक्षिण अफ्रिकेसोबत सामना जिंकल्यानंतर पत्रकारांनी ज्यावेळेस पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना प्रश्न विचारला की भारतासोबतच्या सामन्यानंतर संघात कोणते बदल करण्यात आले, त्यावेळेस ऑर्थर यांनी केलेलं विधान असं होतं की, भारतासोबत पाकिस्तानला तब्बल  89 धावांनी हार पत्करावी लागली, त्यावेळेत अंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी म्हणून संपुर्ण देशामध्ये या सामन्याची चर्चा होत होती. त्यावेळेस पाकिस्तानमधूनही आपल्या संघावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती, हे सर्व पाहून मनामध्ये आत्महत्या केल्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता,  असे विधान पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News