पाकिस्तान पेचात, अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे भारताकडे रवाना?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

या सर्व पार्श्‍वभूमीवर हे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण व्यापारात मोठी वाढ होऊ शकते.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या ‘नाटो’ सहकाऱ्यांच्या बरोबरीने भारतालाही अत्याधुनिक लष्करी साहित्य निर्यात करता यावे यासाठी देशाच्या शस्त्र नियंत्रण निर्यात कायद्यात दुरुस्ती करण्याचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडण्यात आले आहे. 
इस्राईल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया याच ‘नाटो’ मित्रदेशांना अमेरिका उच्च तंत्रज्ञान वापरलेल्या लष्करी साहित्याची निर्यात करते. या देशांच्या बरोबरीने भारतालाही अशा साहित्याची निर्यात करता यावी यासाठी कायद्यात बदल करावा, असे विधेयक डेमोक्रॅटिक पक्षाने मांडले आहे.

विधेयकासाठीची पार्श्वभूमी
पुढील आठवड्यात जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी -२० देशांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर हे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण व्यापारात मोठी वाढ होऊ शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News