भारताच्या पराभवानंतर पाक मंत्र्याचं खिजवणारं ट्विट; पाहा काय केले ट्विट

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

पाकच्या इम्रान खान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी तसे ट्विट केले आहे. 'पाकिस्तानीओं की नई मोहब्बत न्यूझीलंड', असं खिजवणारं ट्विट फवाद यांनी भारताच्या पराभवानंतर केलं आहे. 

पाकच्या इम्रान खान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी तसे ट्विट केले आहे. 'पाकिस्तानीओं की नई मोहब्बत न्यूझीलंड', असं खिजवणारं ट्विट फवाद यांनी भारताच्या पराभवानंतर केलं आहे. भारतविरोधी वक्तव्यावरून फवाद यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले होते. 

 

महेंद्रसिंह धोनी याच्या हँडग्लोव्हजवर असलेल्या भारतीय लष्कराच्या लोगोवरूनही फवाद यांनी टीकास्त्र सोडले होते. फवाद यांनी म्हटले होते की, 'धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत, महाभारतासाठी नाहीत. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये हा मूर्खपणाचा वाद सुरू झाला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांतील एक वर्ग असे काही वागत आहे, जणू काही धोनींना त्यांनी युद्धासाठी सीरिया, अफगाणिस्तान आणि रवांडा या देशांमध्येच पाठवले आहे'. या ट्विटमध्ये फवाद यांनी #Idiots या हॅशटॅगचाही वापर केला होता. मात्र पाकिस्तानचा संघ पूर्वीच विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला आहे. फवाद यांचे हे ट्विट अनेकांना आवडलेले नाही. न्यूझीलंडची स्पेलिंग चुकीची लिहिल्याने अनेकांनी त्यांना ट्रोलही केले. 

वकार युनीसनेही केले ट्विट 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकचा माजी गोलंदाज वकार युनीसने ट्विट करत अप्रत्यक्षपणे भारतावर टीकास्त्र सोडले होते. वकारने ट्विटमध्ये म्हटले होते, ' हा क्रिकेट खेळ क्रूर आहे, तो सर्वांना समान पातळीही दाखवतो... आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा पद्धतीने तो धडाही शिकवतो. आज तर मला मोठाच धडा मिळाला आहे... खेळाची कधीही विटंबना करू नका.' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News