अखेर 'भारत'च पाकिस्तानचा बाप ठरला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात हायव्होल्टेज सामना समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय संघाने फ्युजच काढून टाकला. एकदमच एकतर्फी विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात विजयाची परंपरा कायम ठेवत सातवा विजय मिळवला.

मँचेस्टर :  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात हायव्होल्टेज सामना समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय संघाने फ्युजच काढून टाकला. एकदमच एकतर्फी विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात विजयाची परंपरा कायम ठेवत सातवा विजय मिळवला.

दोन वर्षांपूर्वी याच इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाककडून पराभूत झाला होता त्या अपयशाची सव्याज परतफेड विराट कोहलीच्या टीम इंडियाने केली. रोहित शर्माचे तडाखेबंद शतक, स्वतः विराटची ७७ धावांची खेळीमुळे भारताने 336 धावांचा डोंगर उभा केला आणि पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियामानुसार 89 धावांनी विजय मिळविला.

दोन षटकांची गोलंदाजी करून प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार मांडीच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाद झाला, पण त्याची उणिव भासू न देणारी कामगिरी इतर गोलंदाजांनी केली आणि आपली कणखरता दाखवली. हार्दिक पंड्या आणि वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर यश मिळवणारा विजय शंकर या बदली गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या, परंतु त्या अगोदर कुलदीप यादवची भेदक फिरकी विजयाचा मार्ग खुला करणारी ठरली. त्याने पाकचे धोकादायक फखर झमान आणि बाबर आझम यांना बाद केले. पाकचा डाव सावरणारे हे फलंदाज बाद झाल्यावर त्यांच्या इतर फलंदाजांनी पांढरे निशान फडकावले. 

पाकिस्तानी प्रेक्षक निराश मनाने हळू हळू मैदान सोडून जायची तयारी करू लागले. अपेक्षित धावगतीने दहाचा आकडा पार केला. त्यातून कप्तान सर्फराज विजय शंकरला बोल्ड झाला. 6 बाद 166 धावसंख्येवर पाकिस्तानचा डाव गडबडला असताना परत पावसाची भुरभुर चालू झाली. नंतर खेळ चालू झाला तेव्हा डकवर्थ ल्युईस नियमानुसार 5 षटकात 136 धावा पाकिस्तानला करायच्या होत्या. थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तान संघाची थट्टा नियमही उडवू लागले होते. बरेच भारतीय संघाचे चाहते थंड हवेतही विजय प्रत्यक्ष अनुभवायला थांबले होते. धडपड करूनही पाकिस्तानला 40 षटकांच्या खेळात 6 बाद 212 ची मजल मारता आली. भारताच्या हाती 89 धावांचा विजय आला. 

त्या अगोदर सकाळी रोहित शर्माने भारताच्या वर्चस्वाचा भक्कम पाया उभा केला. केएल राहुलसह 136 धावांची सलामी देत स्वतः 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली. यंदाच्या स्पर्धेतले हे त्याचे दुसरे शतक आहे . रोहितनंतर विराट कोहलीने 77 धावां फटकावल्या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News