'पागलपंती' जॉन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019

'पागलपंती' हा चित्रपट कॅामेडी असून या चित्रपटातील त्याचे पहिले लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिनेता जॉन  अब्राहमचे वेगवेगळ्या भुमिकेतील अनेक चित्रपट आपण पाहीले. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये चांगलीच कमाई केली आहे. काही महीन्यांपूर्वी 'बाटला हाऊस' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. लवकरच तो 'पागलपंती' नावाचा एक चित्रपट घेऊन येत आहे.

'पागलपंती' हा चित्रपट कॅामेडी असून या चित्रपटातील त्याचे पहिले लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सोबतच इलीयाना डीक्रूज,क्रिती खरबंदा, अर्शद वारसी अनिल कपूर हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. 'पागलपंती' चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बामझी करणार आहेत. हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 
 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News