पीईएस अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दहा-बारा लाखाचे पॅकेज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड झाली
  • विद्यार्थ्यांना दहा ते बारा लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्यात येणार
     

औरंगाबाद: पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड झाली असून विद्यार्थ्यांना दहा ते बारा लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. मोहम्मद राहतुल्ला, नवनीत लबोडे, मोहम्मद आर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 
पीईएसमध्ये बीई सिव्हीलच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मोहम्मद राहतुल्ला याची जारो एज्युकेट कंपनीनी निवड केली आहे. त्याला 12 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. तसेच बायजू कंपनीने घेतलेल्या परिसर मुलाखतीत बीई इलेक्‍ट्रिकलचा नवनीत लबोडे आणि बीई सिव्हीलचा मोहम्मद आर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या दोघांना वार्षिक 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.
 
महाविद्यालयाने स्काऊट एज्युकेशन पुणे या संस्थेशी करार केला आहे. याअंतर्गत सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांना सॉफ्टस्कील, टेक्‍निकल स्कील, इंटरव्ह्यू स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. परिसर मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. अभिजीत वाडेकर यांनी अभिनंदन केले. 

विभागप्रमुख डॉ. बी. एन. चौधरी, डॉ. आर. एम. सावंत, डीन इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरऍक्‍शन प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी, टीपीओ कोऑर्डिनेटर प्रा. व्ही. बी. कांबळे, प्रा. वाय. एस. साबळे, प्रा. एन. डी. काकडे, प्रा. संजय काथार, प्रा. नसीम अहमद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News