पी. डी. कारखानीस कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता मोहीम संपन्न

तुषार जाधव, अंबरनाथ
Thursday, 3 October 2019

अंबरनाथ - पी. डी. कारखानीस कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ तालुक्यातील कानसई या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कानसई व त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता अभियान तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवावा अशी जागृती निर्माण व्हावी यासंदर्भात उपक्रम राबवण्यात आले.

यासंदर्भात तरुणांमध्ये जनजागृती तसेच प्लास्टिक मुक्त अभियान यामध्ये तरुणांची मोलाची भूमिका आहे, याची माहितीही या अभियानाच्या उद्बोधनामध्ये दिली तसेच प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्लास्टिकचा वापर करु नये, तसेच इतरांनाही त्यासंदर्भात जागृत करावे असे आवाहन या मोहिमेत केले गेले. 

कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांच्यात सहभागी होऊन शिक्षकांनी हा कार्यक्रम संपन्न केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News