डेंगीच्या आजारावर मात करून, दहावीत मिळवले ९१.६० टक्के

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

तृप्ती ऊर्फ मानसी सुभाष धंदर ही सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी. तिला नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९१.६० टक्के गुण मिळाले.

अकोला - तृप्ती ऊर्फ मानसी सुभाष धंदर ही सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी. तिला नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९१.६० टक्के गुण मिळाले. आता यात काय नवल असे कुणालाही वाटेल. पण या मुलीच्या जिद्दीला सलाम केल्याशिवया राहणार नाही. परीक्षा काळात ती चक्क डेंगीच्या आजारावर उपाचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होते. तेथूनच तिने परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळविले. तिच्या जिद्दीने नक्कीच विद्यार्थ्यांना पेरणा मिळाली आहे.   

डी. ए. व्ही. काॅन्व्हेंट, अकोला या शाळेची विद्यार्थिनी तृप्तीची आई शितल या अकोल्यातील एका खासगी संस्थेत सहायक ग्रंथपाल म्हणून काम बघतात. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुलीला स्वबळावर शिक्षण दिले. आईतील जिद्दीपणाचे गुण मुलीच्या अंगी उतरले नाहीतरच नवल. तृप्तीनेही आईच्या परीश्रमाचे चिज करीत दहावीत घवघवीत यश मिळविले.

विशेष म्हणजे, मार्च २०१९ मध्ये जेव्हा दहावीची परीक्षा सुरू होती, त्याच काळात तृप्तीला डेंगी आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तिला खोडके हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आजारपणामुळे तिला यावर्षी परीक्षेपासून मुकावे लागले आणि तिचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार असेच सर्वांना वाटत होते. मात्र, आईतील जिद्दीपणाचे गुण तृप्तीच्या अंगीही होते.

तिने आशा सोडली नाही. आत्मविश्‍वासाच्या बळावर तिने रुग्णालयातूनच तिने अभ्यास केला आणि परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडविले. तिच्या जिद्दीचे फळही तिला शेवटी मिळाले. दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला. त्यानंतर तिला निकालाची माहिती मिळाली तेव्हा तिचा व तिच्या कुटुंबियाचा आनंद गगणात मावेनासा झाला. तृप्ती केवळ अभ्यासातच हुशार आहे, असे नाही तर ती नृत्य कलेतही पारंगत आहे. कोणत्याही शिकवणीशिवाय तिने नृत्यकला अवगत केली आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News