प्रतिकुल परिस्‍थितीवर मात करून तिने गाठले यशाचे शिखर

राजेश दारव्‍हेकर
Monday, 10 June 2019
  • शाळेतील दिलेला अभ्यास व घरी कामातून वेळ मिळाल्यावर केलेला अभ्यास यातून तीने यश मिळविले आहे. 
  • सेनगाव तालुक्‍यातील सवना येथील बंडू दिवाने हे मतीमंद आहेत. 
  • शनिवारी दहावीचा निकाल लागला तेव्हा शितलचे गावात कौतुक होत असताना वडील हिंगोली येथे गवंड्याच्या हाताखाली कामानिमित्त गेलेले होते.

हिंगोलीः सेनगाव तालुक्‍यातील सवना येथील एका मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटूंबातील मुलगी शितल दिवाने हिने परिस्‍थितीवर मात करीत दहावीच्या परिक्षेत कुठलिही शिकवणी नसताना सुट्टीच्या दिवशी आई वडिलाना कामात मदत करत. शाळेतील दिलेला अभ्यास व घरी कामातून वेळ मिळाल्यावर केलेला अभ्यास यातून तीने यश मिळविले आहे. तिला शिक्षक व्हायचे आहे. 

सेनगाव तालुक्‍यातील सवना येथील बंडू दिवाने हे मतीमंद आहेत. तर आई लताबाई हे दोघे पती पत्‍नी मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात, त्‍यांची मुलगी शितल गावतील जिल्‍हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे आई, वडील आणि स्वतः शितलचे वडील हे सर्वजण जेव्हा काम करतील, तेव्हाच घरची चूल पेटते अशी घरची परिस्थिती आहे. अशातही शितलने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. आईसोबत शाळेला दांडी मारून मजुरीच्या कामाला जात तिने दहावीचे शिक्षण घेतले. वडीलांना त्यांची मुलगी कोणत्या वर्गात आहे याचीही माहिती नाही. 

शनिवारी दहावीचा निकाल लागला तेव्हा शितलचे गावात कौतुक होत असताना वडील हिंगोली येथे गवंड्याच्या हाताखाली कामानिमित्त गेलेले होते. तर, आई देखील मजुरीच्या कामाला गेली होती. दहावीचा निकाल असल्याने शितल पहिल्यांदाच घरी राहिली होती. दहावीच्या परिक्षेत शितलला 77.60 गुण मिळाले आहेत. वडील रात्रंदिवस मोल मजुरीचे काम करतात तर आई मिळेल ते काम करून संसार करते. घरात कोणीही शिकलेले नाही, अशी बिकट परिस्थिती असताना कोणतीही शिकवणी न लावता शितलने हे यश मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शितलला भविष्यात शिक्षक बनायचे असल्याचे ती सांगत असल्याचे तिचे काका गजानन दिवाने यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News