शेवटी धर्मसेनांनी आपली चुक कबुल केली, पण वर्ल्ड कप गेलं त्याचं काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

"ओव्हर थ्रो'वर सहा धावांऐवजी पाच धावा द्यायला हव्या होत्या. पंचांनी निर्णय देताना चूक केली, असे सर्वप्रथण ज्येष्ठ पंच सायमन टौफेल यांनी सांगितले होते. या एका निर्णयाने सामन्याचे चित्र पालटले होते

"ओव्हर थ्रो'वर सहा धावांऐवजी पाच धावा द्यायला हव्या होत्या. पंचांनी निर्णय देताना चूक केली, असे सर्वप्रथण ज्येष्ठ पंच सायमन टौफेल यांनी सांगितले होते. या एका निर्णयाने सामन्याचे चित्र पालटले होते. "थ्रो' झाला तेव्हा फलंदाजांनी खेळपट्टी "क्रॉस' केली नव्हती. त्यामुळे नियमानुसार त्या वेळी पाच धावा देणे अपेक्षित होते. यावरून अंतिम सामन्यानंतर बरीच चर्चा झाली. प्रत्येक स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, मैदानावरील पंच काहीच बोलत नव्हते. 

कोलंबो - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक क्षणी "ओव्हर थ्रो'वर इंग्लंडला सहा धावा देण्याची ही चूक होती, असे पंच कुमार धर्मसेना यांनी सांगितले असेल, तरी आपल्याला दिलेल्या निर्णयाबाबत कसलाही खेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

"ओव्हर थ्रो'वर सहा धावांऐवजी पाच धावा द्यायला हव्या होत्या. पंचांनी निर्णय देताना चूक केली, असे सर्वप्रथण ज्येष्ठ पंच सायमन टौफेल यांनी सांगितले होते. या एका निर्णयाने सामन्याचे चित्र पालटले होते. "थ्रो' झाला तेव्हा फलंदाजांनी खेळपट्टी "क्रॉस' केली नव्हती. त्यामुळे नियमानुसार त्या वेळी पाच धावा देणे अपेक्षित होते. यावरून अंतिम सामन्यानंतर बरीच चर्चा झाली. प्रत्येक स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, मैदानावरील पंच काहीच बोलत नव्हते. 

"ओव्हर थ्रो'चे सगळे नाट्य घडून गेल्यानंतर आता पंच कुमार धर्मसेना यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत होय, ती पंचांची चूक होती, असे मान्य केले आहे. जेव्हा टीव्हीवर या घटनेचे रिप्ले पाहिले, तेव्हा आपल्याला चूक उमगली. पण, आम्हाला टीव्ही रिप्ले पाहण्याची मुभा नव्हती. नाही आम्ही "रिव्ह्यू' घेतला होता. त्यामुळे मला दिलेल्या निर्णयाबद्दल कसलाही खेद वाटत नाही.'' 

माझ्याबरोबर मैदानावर असणाऱ्या पंचांसह आमच्या अन्य सहायकांनीही दोन धावा पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतरच मी माझा निर्णय दिला, असेही त्यांनी म्हटले आहे. 

निर्णय देण्यापूर्वी मैदानावरील सहकारी इरॅस्मस यांच्याशी चर्चा केली होती. आमची चर्चा आमचे सर्व सहकारी पंच आणि सामना निरीक्षकही ऐकत होते. कुणीच आक्षेप घेतला नाही. 
-कुमार धर्मसेना, आयसीसी एलिट पंच

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News