पेपर तपासणीच्या कामातून ५२ वर्षांनंतरचे शिक्षक सुटले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • शिक्षण मंडळ अध्यक्षांचे सहविचार सभेत आश्‍वासन

सिन्नर - पेपर तपासणीच्या कामातून ५२ वय पूर्ण झालेल्या आणि आजाराने त्रस्त असणाऱ्या शिक्षकांना मुक्त करणार असल्याचे आश्‍वासन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिले. पुणे येथे अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. 

महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी अध्यक्षस्थानी होते. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत शाळा मंडळ मान्यतावर्धित व कायम करण्यासाठी शाळा वार्षिक तपासणी अट काढून २०१८-१९ पासून एक हजार रुपये शाळा मान्यतावर्धित शुल्क व रजिस्ट्रेशन शुल्क शिक्षण संक्रमण व किशोर मासिक एवढेच शुल्क वर्षाच्या सुरवातीला डीडी स्वरूपात घेणार असल्याचे श्रीमती काळे यांनी स्पष्ट केले. 

बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रासाठी ३०० ऐवजी २५० विद्यार्थी संख्या व दहावीसाठी २५० ऐवजी २०० विद्यार्थी संख्या आणि आरटीई नियमाप्रमाणे भौतिक सुविधा असल्यास केंद्र घेण्यास हरकत नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी शाळा व शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. मुंबई विभागीय मंडळाचे सचिव अर्जुन मिसाळ, सहसचिव प्रभाकर कुलकर्णी, सुवर्णा राऊत, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष मारोती खेडेकर, नंदकुमार बारावकर, भागचंद औताडे, एस. बी. देशमुख, शत्रुघ्न बिडकर, सतीश जगताप, युनूस पटेल, मनोहर सुरगडे, पी. एम. पवार, धनपाल कोकड, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, जयकर मगर, गोपीनाथ वामने आदी उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News