शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

महापालिकेतील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाकडून ५० टक्के व महापालिका ५० टक्के वेतन दिले जाते. शासनाकडून देण्यात येणारे अनुदान नियमित असून, महापालिकेकडून देण्यात येणारे ५० टक्के वेतन गेल्या १८ महिन्यांपासून थकीत आहे.

जळगाव : महापालिका शाळांच्या निवृत्त शिक्षकांचे शासनाने दिलेले पाच कोटी ४८ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत पडून होते. शासनाचा निधी प्राप्त असूनही शिक्षकांचे वेतन केले जात नसल्याने शिक्षकांनी शिक्षण उपसंचालकांकडे धाव घेतली होती. त्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशाचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले असता आयुक्तांनी शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांना दिले आहे.0

महापालिकेतील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाकडून ५० टक्के व महापालिका ५० टक्के वेतन दिले जाते. शासनाकडून देण्यात येणारे अनुदान नियमित असून, महापालिकेकडून देण्यात येणारे ५० टक्के वेतन गेल्या १८ महिन्यांपासून थकीत आहे. कार्यरत शिक्षक व निवृत्त कर्मचाऱ्यांचे १७ कोटी ५० लाख रुपये महापालिकेकडे थकीत आहेत. तसेच शासनाने शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी दिलेले ५ कोटी ४८ लाख रुपये महापालिकेच्या बॅंक खात्यात पडून आहे. मुख्य लेखाधिकारी या रकमेतून वेतन देत नसल्याने शिक्षकांनी नाशिक येथे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे धाव घेतली होती. 

त्यानंतर शासनाने ५ कोटी ४८ लाख रुपयांच्या अनुदानातून शिक्षकांचे वेतन करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या आदेशाची प्रत शिक्षकांनी आयुक्तांना दाखविली असता आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांना बोलावून शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे आदेश दिले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News