वाढीव आरक्षणाचा मुकमोर्चाने विरोध; विद्यार्थी, महिलांची लक्षणीय उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

चंद्रपूर: पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ठेवू नये, यासाठी शनिवारी (ता. २०) शहरात ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन तर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चानिमित्ताने शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाणे बंद ठेवली आणि मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपांसह बाजारपेठ दिवसभर बंद होती. 

चंद्रपूर: पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ठेवू नये, यासाठी शनिवारी (ता. २०) शहरात ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन तर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चानिमित्ताने शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाणे बंद ठेवली आणि मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपांसह बाजारपेठ दिवसभर बंद होती. 

मोर्चाला दुपारी तीन वाजता गांधी चौक येथून प्रारंभ झाला. मोर्चात महिला, विद्यार्थी, युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. 

मोर्चा कोणत्याही जाती समुहाच्या विरोधात नाही. तो मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे. ‘मग ते कोणत्याही जाती अथवा धर्माचे असो. महाराष्ट्रातील आरक्षणाची ‘मर्यादा ७५ टक्क्यांच्यावर गेली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची परवड होत आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 

सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनचे जनक डॉ. अनिल लद्दड यांनी मोर्चाला समारोपप्रसंगी मार्गदर्शन केले. दोनशे पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या मोर्चात सेवा दिली. यावेळी आरक्षणाची ‘मर्यादा वाढवू नये, गुणवत्ता नष्ट होत असल्याने देशाचे नुकसान होत आहे, अशा आशयाचे फलक मोर्चेक-यांच्या हाती होते. मोर्चात वणी, मुल, भद्रावती, वरोरा, घुग्घुससह जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते. यावेळी एका शिष्टमडळाने मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यात आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे नको, आरक्षण ख-या गरजूंना भेटते का हे बघितले जावे. क्रिमिलेयरची मर्यादा सर्वांना आखून देण्यात द्यावी. मागेल त्याला आरक्षण नको, या मागण्यांचा समावेश होता. 

आंदोलनात सहभागी व्यापारी संस्था
या आंदोलनात चंद्रपूर कापड विक्रेता असोसिएशन, रेडिमेड कापड असोसिएशन,  इनकटॅक्स बार असोसिएशन, कस्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन, सराफा असोसिएशन, सीए असोसिएशन यांनी समर्थन दिले होते. त्यांचे पदाधिकारी आणि सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News