VIDEO-भाजपच्या 'या' मोठ्या नेत्याचा पुरुषासोबत किसींग सीन, चॅट होतेय व्हायरल; भाजपने केलं निलंबीत

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Saturday, 13 July 2019
  • 6 वर्षांपासुन प्रदिप जोशी होते संगठन मंत्री
  • भाजपने केली प्रदिप जोशीची हकालपट्टी

भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये भाजप नेते प्रदिप जोशी हे सर्वांच्या टिकेचं लक्ष्य बनलेत. सोशल माध्यमावर एका तरुणासोबत आक्षेपार्ह्य फोटो शेयर केल्या प्रकरणी त्यांना पक्षसंघटनेच्या पदावरुन काढण्यात आलय. राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

५५ वर्षीय प्रदीप जोशी भाजपच्या उज्जेन विभागाचे सचिव या पदावर होते. प्रदीप जोशी यांनी इंदूरच्या २२ वर्षीय तरुणासोबत सोशल मिडीयावर  चाट करतांना आश्रेपार्ह्य फोटो टाकले होते. प्रदिप जोशी यांनी या तरुणाचं लैगिक शोषण केल्याचा आऱोप मध्यप्रदेश कॉग्रेसचे सचिव राकेश सिंह  यादव यांनी केलाय.या तरुणासोबत गेल्या २० दिवसापासून जोशी चाटींग करताहेत. रंगेल प्रदिप जोशी यांचे प्रताप बाहेर येवू नये यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरल्याचंं राकेश सिंह यादव यांनी म्हटलंय. हा तरुण आता फरार झाला असून त्याच्या सुरक्षेची काळजी वाटते असही यादव यांनी म्हटलंय

या तरुणाने प्रदिप जोशीचं कृत्य जगापुढं आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुण आणि त्याच्या कुंटुबियांना फरार होण्यास भाजप नेत्यांनी बाध्य केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे उज्जेन पोलिसांनी या नेत्याविरोधात तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रदिप जोशींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेक पत्रकारांनी केला. मात्र फोनवर उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून या प्रकरणी चौकशीला सुरुवात झालेली नाही. दरम्यान  भाजपने जोशींचा बचाव करण्याचा प्रयत्न करत, राजकीय सूडापोटी प्रदिप जोशींची बदनामी केल्याचा आोप केलाय. जोशींनी ही पोस्ट डिलीट केल्याचही त्यांनी स्पष्ट केलं,.

दरम्यान उज्जेन जिल्हाचे एसपी सचिन अतूळकर यांनी या संदर्भात अजून तक्रार दाखल झाली नसल्याचं स्पष्ट केलय. प्रसारमाध्यमाद्वारे ही माहिती कानावर आल्याचही त्यांनी म्हटलय. पिडीत तरुणाची ओळख पटू शकलेली नाही. मात्र हे राजकीय नाट्य असचं रंगणार असल्याचं स्पष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News