तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; तातडीने अर्ज करा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 September 2019
  • भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइवर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज भरण्यापूर्वी ही जाहिरात सविस्तर वाचावी आणि त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करावे आणि त्यानंतर नाव नोंदणी करावी.

मुंबई :  सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत कनिष्ठ लिपिक संवर्गाची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे. अर्जात सादर केलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी.

  • पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
  • पदांची संख्या - २६६ 
  • वेतनश्रेणी - एस-६ (रुपये १९,९०० - ६३,२००)
  • शैक्षणिक अर्हता: 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्याशी समकक्ष घोषित केलेली इतर शैक्षणिक अर्हता
मराठी टंकलेखनाची किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा आणि इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआयने घेतलेली परीक्षा उत्तीर्ण

  • वयोमर्यादा: खुला / सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे कमाल ३८ वर्षे मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे 
  • परीक्षा शुल्क:
  • खुला प्रवर्ग - ५५० रुपये 
  • राखीव प्रवर्ग -  ३५० रुपये 
  • महत्वाच्या तारखा: ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: १६ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजल्यापासून) अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ ऑक्टोबर २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News