इंजिनिअरिंग करतायं? पाहा कुठे आहेत संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

आज पाहायला गेलं तर सगळीकडे कॉम्प्युटरचा वापर वाढलेला पहायला मिळतो. कोणतंही काम हे कॉम्प्युटरशिवाय होतच नाही.

इंजिनिअरिंग निवडताना देखील त्यामध्ये अनेक शाखा असतात. त्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हील, कम्प्युटर्स, आयटी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिकल, मरिन, केमिकल, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स यांचा समावेश असतो. यामध्ये कमी अधिक शाखांना वाव असतो. आज पाहायला गेलं तर सगळीकडे कॉम्प्युटरचा वापर वाढलेला पहायला मिळतो. कोणतंही काम हे कॉम्प्युटरशिवाय होतच नाही. ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणे फायद्याचे ठरू शकते. 

सॉफ्टवेअर तंत्रज्ञांना कायमच मागणी राहणार आहे. बँका, हॉस्पिटल्स, मीडिया, एअरलाइन्स, हॉस्पिटॅलिटी, आयटी, रेल्वे, हेल्थकेअर, शिक्षण अशा सगळ्याच क्षेत्रात सॉफ्टवेअर तंत्रज्ञांना कायमच मागणी राहणार आहे. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मोठी संधी उपलब्ध असून यामध्ये नक्कीच उत्तम करिअर होऊ शकते.  

कॉम्प्युटर इंजिनिअर्सना सॉफ्टवेअरसह निमशासकीय नोकऱ्यांमध्ये चांगला वाव आहेच, तसेच मोठ्या शहरात व्यवसाय करण्यासाठी बरेच क्षेत्र उपलब्ध आहे. परदेशात चांगली मागणी, उज्‍जवल करिअरच्या बऱ्याच संधी आहेत. सर्व सॉफ्टवेअर कंपन्या, बँक, रेल्वे, बीएसएनएल, इस्त्रो, सेल आणि अन्य ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय बेवसाइट, डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्क, मिनिस्ट्रेटर हार्डवेअर यामध्ये व्यवसाय देखील सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News