कॅनडात उत्तम दर्जाची सुमारे ५० विद्यापीठे ; या आहेत शिक्षणाच्या संधी

दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक
Wednesday, 3 July 2019

कॅनडा क्षेत्रफळाने जगातील दुसरा मोठा देश असला, तरी तेथील लोकवस्ती विरळ आहे. पुष्कळसा भाग हा बर्फानेच व्यापलेला आहे. तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्न हे १.६५ ट्रिलियन डॉलर म्हणजे अमेरिकेच्या ८.५ टक्के आहे.

अमेरिकेनंतर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला देश म्हणजे कॅनडा. अमेरिकेच्या उत्तरेला असलेल्या या देशाची संस्कृती आणि शिक्षणपद्धती ही अमेरिकेसारखीच आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांतील विद्यापीठांत प्रवेशासाठी एकाच वेळेस अर्ज करतात. गेल्या काही वर्षांत कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रमाण २०१४ नंतर पाच वर्षांत ६३ टक्के वाढले आहे.

मात्र, विशेषतः भारतातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३५ टक्के वेगाने वाढले आहे. कॅनडात २०१८मध्ये एकूण ५,७२,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांपैकी सर्वांत जास्त, म्हणजे १,७२,६२५ (३०.१६ टक्के) विद्यार्थी हे भारतातून गेले होते. त्याखालोखाल चीनमधून १,४३,००० विद्यार्थी गेले आहेत. त्यामुळे परदेशात शिक्षण घेण्यासाठी कॅनडा हा सुद्धा अमेरिकेइतकाच महत्त्वाचा देश ठरत आहे. 

कॅनडा क्षेत्रफळाने जगातील दुसरा मोठा देश असला, तरी तेथील लोकवस्ती विरळ आहे. पुष्कळसा भाग हा बर्फानेच व्यापलेला आहे. तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्न हे १.६५ ट्रिलियन डॉलर म्हणजे अमेरिकेच्या ८.५ टक्के आहे. कॅनडाची स्थानिक लोकसंख्या ही दरवर्षी जेमतेम ०.०४ टक्के वेगाने वाढते आहे. शिवाय वृद्ध लोकांची वाढती संख्या हाही तेथील मोठा प्रश्‍न आहे. म्हणूनच दरवर्षी कॅनडात सुमारे ३ लाख लोक स्थलांतरित होत असतात. सध्या तेथील लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के लोक हे परदेशातून स्थलांतरित होऊन आलेले आहेत. 

कॅनडात उत्तम दर्जाची सुमारे ५० विद्यापीठे आहेत. त्यातील बहुसंख्य विद्यापीठे ही आँटेरियो, क्वेबेक आणि ब्रिटिश कोलंबिया या राज्यात आहेत. या पन्नास पैकी बहुसंख्य विद्यापीठात इंग्रजी भाषेमध्येच शिक्षण देण्यात येते. क्वेबेकमधील काही थोड्या विद्यापीठांमध्ये फक्त फ्रेंच माध्यमांतच शिकवले जाते. फ्रेंच ही कॅनडाची दुसरी अधिकृत भाषा आहे. येथील सुमारे १५ टक्के नागरिक फ्रेंच बोलतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News