अरेरे ! मुंबई इंडियन्सने भारताच्या या स्टार गोलंदाजाला विकले दिल्ली कॅपिटल्सला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

मुंबई इंडियन्सने भारतीय संघाच्या लेग स्पीनर मयांक मार्कंडे याचा दिल्ली कॅपिटल्स फ्रॅंचाईजीबरोबर अदला बदली केली. दिल्लीचा अष्टपैलू शेरफाने रुदरफोर्ड याला आपल्याकडे घेताना त्यांनी मार्कंडेला दिल्ली फ्रॅंचाईजीला दिले.

मुंबई : ‘आयपीएल’चे चार वेळचे विजेते असणाऱ्या मुंबई इंडियन्सने भारतीय संघाच्या लेग स्पीनर मयांक मार्कंडे याचा दिल्ली कॅपिटल्स फ्रॅंचाईजीबरोबर अदला बदली केली. दिल्लीचा अष्टपैलू शेरफाने रुदरफोर्ड याला आपल्याकडे घेताना त्यांनी मार्कंडेला दिल्ली फ्रॅंचाईजीला दिले.

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने म्हटले  की, "मयांक हा प्रतिभावान खेळाडू आहे. तो आमच्या संघातील खेळाडू होता याचा मला अभिमान आहे. हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु मयांकच्या भल्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार असेल. मयांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच रुदरफोर्डला चमूत दाखल करून घेण्याचा आनंदही आहे."

२० वर्षीय रुदरफोर्डने जगभरातील वेगवेगळ्या टी २० लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्याच वर्षी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी २० क्रिकेटमध्ये विंडीजकडून पदार्पण केले होते. कॅरेबियन प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि ग्लोबल टी २० लीग या स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी करून आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले होते.

आणि गेल्याच वर्षी दिल्ली कॅपिटल्सने त्याला चांगल्या रकमेत आपल्याकडे खेचले होते. अष्टपैलू असलेल्या रुदरफोर्डने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोनही प्रकारात त्याने आपली छाप पाडली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १७ सामन्यांमध्ये ४८६ धावा केल्या आहेत आणि ३३ बळी माघारी धाडले आहेत.

दरम्यान, मुंबईच्या संघातून लेंडल सिमन्स, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, एव्हिन लुईस, अल्झारी जोसेफ या कॅरेबियन खेळाडूंनी आतापर्यंत आपली चमक दाखवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News