फक्त 25 रुपयांच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससाठी विद्यार्थ्यांकडून 400 रुपये का ?

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Monday, 17 June 2019

२० पानांच्या झेरॉक्‍ससाठी तब्बल चारशे रुपये शुल्क आकारले जात आहे.

नागपूर- बोर्डाच्या निकालात यावर्षी कमालीची घट झाल्याने उत्तरपत्रिकांची झेरॉक्‍स प्रत मागणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. २० पानांच्या झेरॉक्‍ससाठी तब्बल चारशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यातून बोर्डाची जोरदार कमाई सुरू आहे. एकट्या नागपूर विभागातून पाच हजारांवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी झेरॉक्‍स प्रतींची मागणी केली. त्यातून बोर्डाला आतापर्यंत २० लाखांहून अधिकचा नफा झाला असला तरी २५ रुपयांच्या कामासाठी चारशे रुपये आकारणे हे अव्वाच्या सव्वा शुल्क आहे.  

दोन वर्षांपूर्वी ५० रुपयांत गुणपडताळणी व्हायची. त्यातून विद्यार्थी-पालक समाधानी नसल्याने उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍सची मागणी करण्यात येत होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. मागणीनुसार परवडणाऱ्या दरात झेरॉक्‍सप्रती उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने बोर्डाला दिले. यानंतरही बोर्डाने एका उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससाठी चारशे रुपये तर त्यावरील फेरमूल्यांकना साठी तीनशे रुपये असे एकूण ७०० रुपये आकारण्यास सुरुवात केली. 
यावर्षी बारावीच्या परीक्षेत राज्यात ३ लाख ७७७ विद्यार्थी तर दहावीच्या निकालात जवळपास ३ लाख ७० हजारांवर विद्यार्थी नापास झाले.

विभागीय मंडळात ही संख्या अनुक्रमे १६ हजार ७०४ आणि ५३ हजार २८ आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवार तर दहावीसाठी २९ तारखेपर्यंत झेरॉक्‍ससाठी अर्ज दाखल करता येणार आहे. आतापर्यंत बोर्डांकडे बारावीच्या पाच हजारांवर तर दहावीच्या हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शेवटल्या तारखेपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आठ ते नऊ हजारांवर जाण्याची शक्‍यता आहे. राज्यातील ३० टक्के विद्यार्थ्यांनीही अर्ज केल्यास 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News