आठवणींच्या दुःखावरच हे एकमेव औषध

शंभुराज पाटील
Thursday, 18 July 2019

आपणाला नेहमी काहीतरी विसरले की खूप त्रास होतो. अस वाटत की लहानपणापासून रोज दोन बदाम खात आलो असतो तर आज नक्कीच सगळं काही लक्ष्यात राहिले असतील.

आपणाला नेहमी काहीतरी विसरले की खूप त्रास होतो. अस वाटत की लहानपणापासून रोज दोन बदाम खात आलो असतो तर आज नक्कीच सगळं काही लक्ष्यात राहिले असतील. परीक्षेच्या तयारी करताना वाचलेलं सगळं लक्ष्यात राहुदे म्हणून देवाला हात जोडणारे आपण खरंच मनापासून विसरणे या गोष्टीचा तिरस्कार करतो का?
    
खरंच आपण चांगल्या गोष्टींची जशी स्मृती ठेवतो तसेच वाईट गोष्टी विस्मृती केल्या पाहिजेत. तेच खरं दुःखी न होण्याचे कारण आहे. रांगत रांगत पायावर उभे राहिलेले बालपण नक्कीच आठवले पाहिजे पण त्या वेळी काही गोष्टी मिळाल्या नाही म्हणून असलेला वडिलांबद्दल राग विसरला पाहिजे. शिक्षकांनी शिकवले धडे लक्ष्यात राहिलेच पाहिजे पण शिस्त लागावी म्हणून मारलेला दणका विसरला पाहिजे. प्रेमाच्या नाजूक गोड आठवणी लक्ष्यात राहिल्या पाहिजेत पण विरह झाल्यावर नव्या आयुष्याची सुरवात करताना काही कडू आठवणी विसरल्या पाहिजेत.
     
मनात घर करून बसलेल्या आठवणी फक्त आणि फक्त त्रास व्हावा म्हणून आपण जपून ठेवत असतो. पण प्रत्येक मावळता सूर्य ही नवी पहाट घेवून येत असल्यामुळे आपणाला नव्या आठवणी साठवण्यासाठी काही जुन्या आणि त्रासदायक आठवणी विसरल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्याचा चढ उताराचा प्रवास करून जेव्हा आपण शेवटच्या टोकावर पोहचतो तेव्हा सोबत फक्त आठवणी असतात. आणि मला वाटतं अश्या वेळी फक्त चांगल्या आठवणीच लक्ष्यात राहिल्या पाहिजेत. बाकी सगळे विसरता आले पाहिजे.
     
शेवटी सगळ्या गोष्टीचा सार सांगायचं झाल तर अस म्हणजे की जशी असण्याची सवय लागते तशी नसण्याची सुद्धा सवय लागते. आठवणीच्या दुःखावर विसरणे हेच औषध असते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News