देशात MBBSच्या 4465 जागा आणि महाराष्ट्राच्या वाट्याला इतक्या जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • राज्यात रुग्णसेवकांची/डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना थोड्याप्रमाणातच यश मिळाल्याचे दिसुन येत आहे.

मुंबई - राज्यात रुग्णसेवकांची/डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना थोड्याप्रमाणातच यश मिळाल्याचे दिसुन येत आहे. कारण मोदी सरकारने देशात MBBS धारक डॉक्टरांच्या जागा भरण्यासाठी 4465 जागांचा आदेश जारी केला असला तरी महाराष्ट्रात गरजेपेक्षा खूपच कमी म्हणजेच फक्त 970 जागा भरणार आहेत. इतर राज्यात त्या-त्या रिकामी जागांच्या तुलनेत जास्तीत जास्ती 450 जागांची उपलब्धता करून दिली आहे. 

राज्यात वैद्यकिय शिक्षण विभागाने केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडे MBBS च्या जागा वाढीबद्दल प्रस्ताव मांडला होता, त्या प्रस्तावाला मंत्रालयाने मान्यता देत 2019-20 च्या प्रवेशप्रक्रियांना सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत, त्यातच भर म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) लागू करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आधारे भराव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News