ऑनलाईन शॉपिंग करताना अशी होते फसवणूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलती आणि ऑफर यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होत असतात. यामागे देखील अनेक करणे आहेत.

मुंबई : सध्या ऑनलाईन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढते आहे. प्रत्येक्षात जाऊन खरेदी करण्यापेक्षा एका क्लिकवर ऑनलाईन वस्तू मिळविण्याकडे कल अधिक असतो. मात्र या शॉपिंगमधून होणारे तोटे देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलती आणि ऑफर यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होत असतात. यामागे देखील अनेक करणे आहेत.

अनेक ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून कॅशबॅक, मोफत गिफ्ट, व्हाउचर्स, याशिवाय विविध ऑफर देण्यात येतात, आणि ग्राहक इथेच या ऑफरला भुलतो. मात्र या सर्व क्लृप्ती असल्याचं काही प्रकरणातून समोर आलं आहे. 

काहीवेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ऑनलाईन पेमेंट केल्याने आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती या कंपन्यांकडून सेव्ह केली जाते. 

याशिवाय एखादी महागडी किंवा मोठी वस्तू खरेदी केल्यानंतर फीडबॅक कॉल या कंपन्यांकडून येत असतो. काहीवेळा हा कॉल कंपनीकडून न येता फसवणूक करणाऱ्यांकडून येत असतो. कंपनीच्या नावाखाली तुमचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 

व्हेरिफिकेशन प्रोसेस असल्याचं सांगून तुमचा पत्ता, ईमेल आयडी, बँक डिटेल्स, ऑर्डर आयडी, याबाबत माहिती मागवली जाते. त्यानंतर तुम्ही महागडी वस्तू खरेदी केल्याने त्यावरील ऑफर किंवा गिफ्टचे लालूच दिले जाते. यासाठी काही पैसे भरण्याची विनंती ग्राहकांना केली जाते. अनेकजण ऑनलाईन पेमेंट करून मोकळे होतात, आणि फसतात. 

ऑनलाईन शॉपिंग करताना विशेष काळजी घेणं गरजेचं ठरत. ऑनलाईन शॉपिंग कंपनी किंवा ई-कॉमर्स वेबसाईट कधीही लकी ड्रॉ प्रमाणे ऑफर ग्राहकांना देत नाही. याशिवाय बक्षीस देण्यात येईल असे देखील  सांगण्यात येत नाही. 

त्यामुळे अशा ऑफरला बळी न पडता याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच माहिती देणे योग्य ठरेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News