अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

मागील वर्षी ऑनलाइन अर्ज नोंदणी तीस  दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती.

नागपूर - राज्याच्या शिक्षण विभागामार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. मात्र, दहा दिवसात केवळ २० हजार २२२ विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन  नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरला आहे. विशेष म्हणजे शाळांमध्येच शहरातील  विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावयाची होती. तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि  शहराबाहेरील विद्यार्थ्यांना १९ केंद्रातून माहितीपुस्तिकांची खरेदी आणि अर्जाचा पहिला भाग भरावयाचा होता. 
२० हजार २२२ विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन अर्जांची नोंदणी केल्याची माहिती समितीमार्फत देण्यात आली.

मागील वर्षी ऑनलाइन अर्ज नोंदणी तीस  दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आता शहरासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थीही नोंदणीस सुरुवात करणार असल्याने पुन्हा गर्दी वाढेल अशी आशा केंद्रीय समितीकडून व्यक्त करण्यात आली.  शहरातील ५४ हजार २३० जागांसाठी मागील वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.  त्यापैकी जवळपास १७ हजार ६१९ जागा रिक्त राहील्या होत्या. यात प्रामुख्याने कला, वाणिज्य आणि थोड्याफार द्विलक्षी, विज्ञान शाखेतील जागांचा समावेश होता. त्यामुळे नोंदणीला प्रतिसाद बघता, यावर्षीही रिक्त जागांची संख्या वाढणार की काय? अशी शंका महाविद्यालयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अकरावीच्या शाखानिहाय जागा 
कला - ८,८२०
वाणिज्य -     १६,१८०
द्विलक्षी व विज्ञान - २५,१००
एमसीव्हीसी - ४,१३०
एकूण-     ५४,२३०

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News