औरंगाबादेत अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्यांचा आकडा फक्त 1 हजार 980 इतकाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशप्रक्रियेची केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी  दुपारी जाहीर करण्यात आली होती.
  • यंदा प्रवेशासाठी ११० महाविद्यालयांत २९ हजार १०० एवढी प्रवेशक्षमता असणार आहे.

औरंगाबाद - सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशप्रक्रियेची केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी  दुपारी जाहीर करण्यात आली होती. त्यात तीन हजार ५२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. गुरुवारपर्यंत  प्रवेशास मुदत देण्यात आली होती. त्यात एक हजार ९८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. 

औरंगाबाद महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यंदाचे हे ऑनलाइन प्रवेशाचे तिसरे वर्ष असणार आहे. यंदा प्रवेशासाठी ११० महाविद्यालयांत २९ हजार १०० एवढी प्रवेशक्षमता असणार आहे. प्रवेशासाठी १७ हजार १५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासाठी चार जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. पहिली गुणवत्ता यादी ही १२ जुलैला जाहीर करण्यात आली. यात ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. त्यात सात हजार ४६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

दुसरी गुणवत्ता यादी ही २२ जुलैला जाहीर करण्यात आली. त्यात तीन हजार ५२१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. त्यात एक हजार ९८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या दोन फेऱ्यांमध्ये नऊ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. २७ आणि २९ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग एक आणि भाग दोनमध्ये बदल करता येईल. उर्वरित १९ हजार ४५८ रिक्त जागांसाठी तिसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी एक ऑगस्टला जाहीर करण्यात येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News