BJPचा नवा फंडा, एक कोटी रोजगारके साथ बारा तास वीजपुरवठा

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त घोषणांचा पाऊस

मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदे भरण्याची घोषणा करण्यात येऊनही प्रत्यक्षात त्याची अंमबजावणी झाली नसतानाही येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे वचन भाजपच्या आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘संकल्पपत्रा’त देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे हंगामी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील; तसेच विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज ‘संकल्पपत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही त्यात देण्यात आली आहे. या ‘संकल्पपत्रा’त (जाहीरनामा) अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक; तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात आले असून, ही स्मारके २०२० मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये पक्षाचा जाहीरनामा (दृष्टीपत्र) जाहीर केले होते. त्यात ही दोन्ही स्मारके उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत भाज

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News