लिंक ओपन करताचं मोबाईल झाला हॅंग; अर्धा तासात खात्यातून गेले 95 हजार!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • कपडे व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणूक 
  • मोबाईलवरून गुगलवर जाऊन मेक माय ट्रीप कस्टमर केअर सर्च केले
  • हा बोलीऐ मैं रोहित बोल रहा हुं असे म्हणून समोरील व्यक्तीने संवादाला सुरवात केली.

सोलापूर: गुगलवरून मेक माय ट्रीपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी चौकशी केली. कस्टमर केअरने लिंक पाठविली. लिंक ओपन करताना मोबाईल हॅंग झाला आणि अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. सोलापुरात कपडे व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणुकीची घटना मंगळवारी समोर आली आहे. 

यश राजकुमार पंजवाणी (वय 25, रा. अंत्रोळीकर नगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश याने मोबाईलवरून गुगलवर जाऊन मेक माय ट्रीप कस्टमर केअर सर्च केले. तिथे मिळालेल्या क्रमांकावर यशने कॉल केला. हा बोलीऐ मैं रोहित बोल रहा हुं असे म्हणून समोरील व्यक्तीने संवादाला सुरवात केली. 

यशने त्याची कोइमतूर फ्लाईटचे तिकीट रद्द करण्याविषयी सांगितले. आरोपी रोहित याने यशच्या मोबाईलवर लिंक पाठविली. यशने मी लिंक ओपन केली. त्यानंतर त्याचा मोबाईल हॅंग झाला. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर यशच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या कस्तुरबा मार्केट शाखेतील खात्यातून आरोपीने टप्याटप्याने 95 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना 3 जुलै 2019 रोजी ही घटना घडली असून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने यश पंजवाणी याने पोलिसात धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार तपास करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News