पुन्हा एकदा सैराट; बायको आणि पोलिसासमोर पतीची केली हत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे.
  • एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे. एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे.

 

अहमदाबाद - पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती अहमदाबादेत घडली आहे. एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे. एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे.

अहमदाबादपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडल तालुक्यात ही घटना घडली. दलित तरुणानं मुलीच्या कुटूंबियांच्या इच्छेविरूद्ध लग्न केल्यानं संतापलेल्या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलून हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही मारहाण होत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यानं तिथून पळ काढला. 

23 वर्षीय हरेश सोळंकीला आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची हिंमत कशी केलीस, असे विचारत मुलीच्या कुटूंबियांनी सुरा भोसकून हरेशची हत्या केली. लग्नामुळे झालेला वाद मिटवण्यासाठी दोघेही उर्मिलाच्या घरी गेले होते. यावेळी सरकारचे अभयम पथही सोबत होते, पण हा प्रकार घडल्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्यानेही तेथून पळ काढला. 

आठ महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. हरेश एका कंपनीत चालक म्हणून कामाला होता. उर्मिला काही दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती, तिला आणायला गेला असता, हरेशची हत्या करण्यात आली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News