आजी-आजोबांनी चोरट्यांना पळवले; व्हिडीओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019
  • 70 वर्षीय शन्मुगवेल व त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरी चोरी करण्यास आलेल्या दोन अट्टल चोरांना घरातील वस्तूंनी मारून पळवून लावले.

कल्याणीपुरम (तमिळनाडू) : संध्याकाळी निवांत घराबाहेरच्या अंगणात बसलेले असाताना काही चोर मागून येतात, आजोबांचा गळाा आवळण्याचा प्रयत्न करतात... पण आजोबांचे वय 70 असले तरी ते तितक्याच जोराने त्या चोरांना पळवून लावतात, त्याच्या जोडीला आजी येतात आणि हे सिंघम दाम्पत्य मिळून या चोरांना मारून मारून पळवता....

हो... ही गोष्ट नसून खरी घटना आहे. तमिळनाडू मधल्या कल्याणीपुरममधील... 70 वर्षीय शन्मुगवेल व त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरी चोरी करण्यास आलेल्या दोन अट्टल चोरांना घरातील वस्तूंनी मारून पळवून लावले. या चोरांकडे हत्यारे होती, पण शन्मुगवेल व त्यांच्या पत्नीने खुर्ची, स्टूल त्यांच्या अंगावर भिरकावून त्यांना पळवून लावले.

 

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या वयात त्यांनी हे धाडस केल्यामुळे त्यांचे कौतुक होतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News