जुनी मैत्री

सागर गायकवाड
Monday, 1 April 2019

बोलता बोलता खूप वेळ झाला होता मग सर्व म्हणाले चला आता निघुया, पण खरंच सर्वांना पुन्हा भेटून खूप बरं वाटलं, पुन्हा भेटू असे बोलून आम्ही सर्वे निघालो.
पण खरंच काय ते जुने खेळ होते. पण आताच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हे खेळ कुठे तरी हरवले आहेत.

आज खूप वर्षा नंतर सर्व मित्र भेटलो होतो.  सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या, तोच जुना कट्टा अजूनही तसाच होता . आणि पुन्हा तसेच बसण्यावर्ण भांडण झालं तेच वाक्य पुन्हा आज ऐकले तिथे मी बसणार येथे मी बसणार हे आमचं चालू असताना सर्वजण  हसू लागले आणि थोड्याच क्षणात सर्वांचे डोळे अश्रूंनी हलकेसे भरून आले. मग सर्वजण बसलो आणि आमचं बोलणं सुरू झालं. सर्व त्या जुन्या आठवणी, बोलू लागलो, बोलतात बोलता लहानपणी खेळलो होतो सर्व खेळ आठवू लागलो. 

खरंच काय खेळ होते ते लपंडाव , खो-खो, पकडा-पकडी, सोनसाखळी,डिंगगोरचा, कानखुपरी, ते बिलयांवर पथर खेळणे, कोयबा, जणू कित्येक खेळ खेळलो . खरंच काय खेळ होते ते, काय ती लहानपणीची  मजा आता बाबांनी घरी आणलेल्या आंबांच्या चवी पेक्षा, लहानपणी गोडआंबे काकांच्या झाडावरन चोरलेल्या आंब्यांनची चवच जास्त गोड होती.ते दुपारी गोखले काकूंची झोप मोड करण्यात एक वेगळीच मजा होती. घरात बसून 42 इंच टीव्ही बघण्या पेक्षा घोरपडे काकांचा त्या छोट्या टीव्ही वर दूरदर्शन बघायला जास्त मजा यायची. घरातून जे सकाळी 10 वाजता निघायचो ते घरी डायरेक्ट 7 वाजता यायचो पूर्ण दिवस कसा निघून जायचं कळायचं सुद्धा नाही. 

असेच  सर्व काही बोलणं चालू होतं आम्हा सर्व मित्रांचे बोलता-बोलता कधी आम्ही आमच्या बालपणात पोहचलो कळलेच नाही. आम्ही सर्व आमच्या बालपणात गुंतलो होतो.असेच आमच्या सर्वनचे बालपण आमच्या डोळ्या समोरून गेले. ते लपंडाव खेळतांना कोणाच्या घरात लपणे, कधी एखादया झाडावर चडून लपणे, कधी घरांच्या पत्र्यावर जाऊन लपणे, खरचं कुठे कुठे लपून बसायचो.

खो-खो खेळतांना तर इतकी मजा यायची, त्या छोट्या मैदानातच एकमेकांना पकडणे, अचानक एखाद्यला खो देने, पण तितक्याच चातुर्याने समोरच्याला बाद करण्यासाठी खो देन, खरचं काय मजा यायची.पकडा-पकडी खेळतांना तर पूर्ण मैदानभर धावायचो. खेळतांना त्या एकाचाच पाठलाग करणे, आणि तेच त्याला चुकाऊन पळून निघणे, सोनसाखळी खेळतांना तर एक वेगळाच आनंद वाटायचा, ते एकावर राज्य असायचा मग तो एक- एकाला पकडत साखळी तयार करायची आणि यात खेळात सर्व मित्रांचा हात-हातात यायचा आणि आमच्या मैत्रीची एकाकी दिसायची आणि साखळी पूर्ण झाली की आम्हीं नेहमी म्हणायचो ही दोस्ती तुटायची नाय, एक वेगळाच आनंद वाटायचा.डिंगगोरचा खेळतांना तर जरा जास्तच मजा यायची एकमेकांना मारायला जे मिळायचे, काय खेळ होता तो, सात  दगड एकमेकांनावर ठेवून त्यावर बॉल मारून ते पाडायचे, सात-सात जणांची टीम करून, एका बाजूला एक टीम आणि एका बाजूला दुसरी टीम, ज्या टीम ने दगडं पडले त्यानी पळून जायचे आणि मग परत दुसऱ्या टीमच्या नकळत ते पुन्हा एकावर एक लावायचे आणि दुसऱ्या टीम ने त्याना बॉल मारून हरवायचे काय मजा यायची.

कोयबा खेळायला तर काय मजा याची, आणि कोयबा खेळतांना आम्ही कधीही कोयबा हा शब्द वापरलाच नाही, नेहमी म्हणायचो चला रे गोट्या खेळायला जाऊ, आणि काय-काय खेळ खेळायचो गोटयांच्या नावाने आणि माझं आवडता होता कानखुपरी ते त्रिकोण किंवा चौकोन करून गोट्या आत लावून त्या बाहेर काडायांच्या आणि मग ज्यांच्या गोट्या बाहेर आहेत त्याना कान पकडून त्या खुरपायला लावायच्या आणि त्या गोट्या त्रिकोण किंवा चौकोनाच्या आत न्यायच्या, खरंच इतकी मजा याची ना, हे सर्व बोलताना सायंकाळ कधी झाली आम्हाला कळलेच नाही. बोलता बोलता खूप वेळ झाला होता मग सर्व म्हणाले चला आता निघुया, पण खरंच सर्वांना पुन्हा भेटून खूप बरं वाटलं, पुन्हा भेटू असे बोलून आम्ही सर्वे निघालो. पण खरंच काय ते जुने खेळ होते. पण आताच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हे खेळ कुठे तरी हरवले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News