प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी टॉवरवर रात्र काढली जागून

मंगेश शेवाळकर
Wednesday, 7 August 2019
  • विकास कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.
  • प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलकांनी मंगळवारी (ता.६) टॉवरवर रात्र जागून काढली

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील विकास कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलकांनी मंगळवारी (ता.६) टॉवरवर रात्र जागून काढली.

सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सन 2013 ते सन 2019 पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गावातील सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा, प्रत्येक प्रभागांत विद्युत पोल उभारणी करून पथदिवे बसवावेत, नादुरुस्त विद्युत पोल बदलून द्यावेत, स्वच्छतागृह बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अॅड. विजय राऊत, मारुती कोरडे, रवी बांगर, विलास आघाव, भारत कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी नजीर शहा, मोबीन शहा, अनिल मानेकर, शिवाजी तुरे, किशोर सुलताने, सिताराम सातपुते, अशोक डांगे, साबेर शहा, शबिर शहा, सूनील घनतोडे, यांनी गावातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. 

त्यानंतर सेनगांवचे गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन अहवाल दिला. मात्र हा अहवाल चुकीचा असल्याचे सांगत आंदोलकांनी अहवाल घेण्यास नकार दिला. रात्री पर्यंत कोणीही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आल्याने रात्री आंदोलन सुरू होते आंदोलनकर्त्यांनी रात्र जागून काढली. यावेळी गावकरी व पोलीस कर्मचारी हजर होते. या प्रकारणात आज काय होणार याकडे गावकर्‍यांची लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News