ग्राहकांच्या समाधानासाठी अधिकारीदारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता चक्क महावितरण कार्यालयाचे अधिकार्‍यांनी ग्राहकांच्यादारी जाऊन त्यांच्या समस्याचे निराकरण केले.

यवतमाळ : ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता चक्क महावितरण कार्यालयाचे अधिकार्‍यांनी ग्राहकांच्यादारी जाऊन त्यांच्या समस्याचे निराकरण केले. याप्रसंगी महावितरण जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी हे पांढरकवढा विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य व आपल्या अभियंता, बिलींग, मानव संसाधन या सर्व टिमसह पांढरकवडा विभागातील पाटण बोरीत जाऊन खुद्द ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या व काही समस्या निपटारा देखील जागेवरच करण्यात आला. तर काही समस्यांवर आठ दिवसाच्या आत कारवाई करण्याचे निर्देश आपल्या विभागाला  दिले.

पाटणबोरी कार्यालयाच्या पटांगणाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या  यामेळाव्यात बिलींग बाबत आलेल्या तक्रारीचा निपटारा करतांना अधीक्षक अभियंता म्हणाले की, वीजबिल हा ग्राहकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने भविष्यात ग्राहकांची रिडींगबाबत तक्रार निर्माण होऊ नये याबाबत सोबत असलेल्या बिलींग विभागाला निर्देश दिले. अखंडित वीजपुरवठ्यासाठी बोरी पेट्रोल पंपाजवळील एक आणि वारा येथील एक असे दोन रोहित्र 2 ते 3 दिवसात कार्यान्वित करणार असल्याचेही यावेळी त्यांनी गावकर्‍यांना सांगितले. 

तसेच या परिसरातील ग्राहकांना वीजपुवरठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्याकरिता पाटणबोरी या महावितरण केंद्रावर मोबाईल नंबर उपलब्ध करून देताना ग्राहकांच्या तक्रारीवर दखल न घेणार्‍यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगत दर तीन महिन्यांनी ग्राहकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणतर्फे या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. महावितरणने ग्रामीण भागातील जनतेला वीज बिल भरण्यास सोयीचे जावे, व एखाद्या बेरोजगारास रोजगार मिळावा यासाठी पेमेंट वॉलेट लाँच केले आहे. 

याविषयी मुख्यमंत्री सौरकृषीपंपा विषयी यावेळी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. पाटण बोरी वितरण केंद्राअंतर्गत असलेल्या बोरी, वारा गावातील समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आयोजित या मेळाव्यात येथील सरपंचाना आपल्या गावातील वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारी दाखल करण्याच्या पूर्व सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मेळाव्यात पाटणबोरी येथील सरपंच नेमलवार, मनोज भागनागरकर, जयंत भागनागरकर, सचिन कोगुरवार, आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News