ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करा; ओबीसी महासंघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

गोंदिया : जिल्हा व तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघ व जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिले.

गोंदिया : जिल्हा व तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघ व जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिले.

ओबीसी समाजाची २०२१ मध्ये जातवार जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील  मुलांसाठी व मुलींसाठी भाड्याच्या इमारतीत २०१९-२० शैक्षणिक सत्रापासून जिल्हा व तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात यावी, विधिमंडळ ओबीसी समिती गठित करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वळता करावा, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष जाहीर करून तो भरण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत ओबीसी विभागाची कार्यालये सुरू करावी, ओबीसी, व्हीजे, एससी, एसबीसी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता लावण्यात आलेली १ लाख रुपये उत्पन्नाची अट एससीएसटी संवर्गाप्रमाणे २.५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, महात्मा जोतिराव फुले समग्र वाङ्‌मय १० रुपयात उपलब्ध करून द्यावे, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमात १०० टक्‍के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात तालुका ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावे आदींसह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे, कोषाध्यक्ष कैलाश भेलावे, रवी भांडारकर, बहुजन युवा मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, भारतीय पिछडा संघाचे अध्यक्ष प्रेम साठवणे, ओबीसी सेवा  संघाचे प्रेमेंद्र चव्हाण, प्रा. संजीव रहांगडाले, नितीन राऊत, एस. टी. बिसेन, पप्पू पटले, चुनेश पटले, ओबीसी विद्यार्थी संघटनेचे सचिव गौरव बिसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर, नरेंद्र तुरकर, नितीन कटरे, सुरेंद्र पटले उपस्थित होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News