आता ‘ओबीसी संघटना’ मराठा आरक्षणाला आव्हान देणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • ओबीसी संघटनांचा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय
  • ओबीसी आरक्षण योजनाबद्ध पद्धतीने संपविण्याचा डाव देवेंद्र फडणवीस सरकारने रचला असल्याचा आरोप
  • मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने देण्यात आले असून या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याचे सांगत राज्यभरातील ओबीसी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील भूमिका ठरवण्यासाठी ओबीसी संघटनांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील विविध ओबीसी जाती संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांनी दिलेल्या मराठा आरक्षण निर्णयाला येत्या आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याचबरोबर ओबीसी आरक्षण योजनाबद्ध पद्धतीने संपविण्याचा डाव देवेंद्र फडणवीस सरकारने रचला असल्याचा आरोप करत हा डाव सर्व शक्तीनिशी उधळून लावण्याचा निर्धार या वेळी उपस्थित विविध ओबीसी जाती संघटनांनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News