अबब, दुसरीच्या अभ्यासक्रमाचे अजून प्रशिक्षणच नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 November 2019

शाळेचे पहिले सत्र संपले तरीसुद्धा अद्याप दुसरीच्या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे नव्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना नेमके काय अपेक्षित आहे, याबाबत शिक्षक संभ्रमात आहेत.

महागाव : शाळेचे पहिले सत्र संपले तरीसुद्धा अद्याप दुसरीच्या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे नव्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना नेमके काय अपेक्षित आहे, याबाबत शिक्षक संभ्रमात आहेत.

यंदा शैक्षणिक वर्षाची सुरवात दुसरीच्या गणित पुस्तकावरील वादाने झाली. विद्यार्थ्यांना दशक, दोन अंकी संख्या समजण्यासाठी नवा पर्याय गणिताच्या अभ्यास समितीने पाठ्यपुस्तकात दिला. त्यावरून त्याची आवश्‍यकता, ती पद्धत कशी वापरावी याबाबत वाद निर्माण झाला. शिक्षकांना शंका असल्यास त्यांना प्रशिक्षणामध्ये उत्तर देण्याचे अभिवचन शिक्षण विभागाने दिले.

याशिवाय गणिताच्या पुस्तकात अनेक बदल करण्यात आले आहेत. इंग्रजी, मराठी पुस्तकातही बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतही शिक्षकांना अनेक शंका आहेत. पुस्तके बदलल्यानंतर बदलाची कारणे, पुस्तकाच्या अनुषंगाने शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल असावेत, घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणती कौशल्य येणे अपेक्षित आहेत, अशा अनेक बाबींची स्पष्टता

येण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित असते; मात्र पहिले सत्र संपले तरीसुद्धा दुसरीच्या पाठ्यपुस्तकाचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने घेतलेले नाही. शिक्षकांना प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे आहे. या परिषदेने लवकर नियोजन करून शिक्षकांना दुसरी अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News