आता राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • निवडणूक आयोगाकडून प्रस्ताव सादर
  • प्रस्तावाचा सरकारकडून अभ्यास सुरु 
  • कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे लोकसभेत प्रतिपादन 

नवी दिल्ली : उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सरकारकडून सध्या अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत दिली.  

प्रसाद यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे, की उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. निवडणुकीतील खर्चाबाबत २०१५ मध्ये झालेली चर्चा आणि कायदा आयोगाच्या निवडणूक सुधारणांबाबतच्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

उमेदवारांप्रमाणेत राजकीय पक्षांनाही निवडणुकीतील खर्चासाठी मर्यादा आखून देण्याची आवश्‍यकता आसल्याचे त्यात नमूद केले आहे. या प्रस्तावाला संबंधित सर्व घटकांचा पाठिंबा आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News