आता सचिन म्हणतोय, ‘संघासाठी जे योग्य; तेच धोनीने केले’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

धोनीला आधी धारेवर धरल्यानंतर सचिन तेंडुलकरने आता मात्र त्याला पाठिंबा दिला आहे

अफगाणिस्तानविरुद्ध धोनीचा वेगवान फलंदाजीचा उद्देशच नसावा आणि त्याने प्रमाणाबाहेर डॉट बॉल्स खेळले अशी टीका त्याने केली होती

धोनीला आधी धारेवर धरल्यानंतर सचिन तेंडुलकरने आता मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धोनीचा वेगवान फलंदाजीचा उद्देशच नसावा आणि त्याने प्रमाणाबाहेर डॉट बॉल्स खेळले अशी टीका त्याने केली होती. आता नव्या संदर्भात सचिनने म्हटले आहे की संघासाठी जे योग्य होते तेच नेमके धोनीने केले. बांगलादेशविरुद्ध धोनीने ३३ चेंडूंत ३५ धावा केल्या.

शेवटच्या १० षटकांत भारताला ६३ धावा करता आल्या. सचिन म्हणाला, की ‘बांगलादेशविरुद्ध धोनीच्या दृष्टिकोनात काहीही चुकीचे नव्हते. त्याची खेळी संघासाठी महत्त्वाची होती. तो ५० षटकांपर्यंत टिकला तर बरोबर खेळणाऱ्या इतर खेळाडूंना मदत करू शकतो. त्याने हे करणे अपेक्षितच हाेते.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News