आता सोलापुरात "दामिनी'च्या पथकाची गस्त असणार

परशुराम कोकणे
Friday, 2 August 2019
  • महिलांच्या सुरक्षेसाठी नवी संकल्पना 

सोलापूर - शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी आता "दामिनी'चे पथक सज्ज झाले आहे. पूर्वी दुचाकीवर दोघी दामिनी गस्त घालत होत्या, आता नव्या संकल्पनेनुसार दामिनीचे पथकच शहरात गस्त घालणार आहे. 
पूर्वी दुचाकीवरून दोघी दामिनी शहरात गस्त घालत होत्या. तक्रार आल्यानंतर शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीनुसार दामिनी काही वेळात घटनास्थळी दाखल व्हायच्या. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी दामिनीच्या कामाच्या रचनेत थोडेसे बदल केले आहेत. सकाळी पोलिस आयुक्तालयातून दामिनीचे पथक एकत्रितपणे दुचाकीवरून शहराच्या गस्तीसाठी बाहेर पडणार आहे. या पथकामध्ये किमान सहा दामिनी (महिला पोलिस) असणार आहेत. त्यांच्यासोबत पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारीही असणार आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही या नव्या संकल्पनेस प्रोत्साहन दिले आहे.

महिला, विद्यार्थिनींच्या मदतीसाठी पोलिस दल सदैव सज्ज आहे. शाळा, महाविद्यालयांत गस्त घालणाऱ्या "दामिनी'ला आता पथकाचे रूप देण्यात आले आहे. यामुळे दामिनीची कामगिरी अधिक चांगल्याप्रकारे दिसून येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी 1091 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News