पीजीसाठी आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019
  • पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यंदाच्या वर्षी केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये  व्यावसायिक अभ्यासक्रमांची 'सीईटी' परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे.

 निश्चित कालावधीत विद्यार्थांचे प्रवेश पुर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासुन पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया ही वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रवेश प्रक्रीयेमध्ये अडचणी येऊ नये म्हणुन केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी विद्यापीठातील विभागप्रमुखांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, उस्मानाबाद उपपरिसरातील ५० विभागप्रमुखांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दहा विषयाची व पंधरा उपविषयांची विषयपत्रिका अजेंडा विभागप्रमुखांना पाठवण्यात आला. त्यासोबतच विद्यार्थांच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात आणि निकालासंर्भातही चर्चा करण्यात आल्या.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News