वंचित बहुजन आघाडीचे आता हे अधिकृत चिन्ह; महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करु शकते.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलं आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह मिळालं आहे.

कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह

वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
संभाजी ब्रिगेड – शिलाई मशीन
महाराष्ट्र क्रांती सेना – हिरा
हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी
टिपू सुलतान पार्टी – किटली
भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News