टिकटॉकसाठी आता हे असणार नियम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

सध्या भारतात ‘टिकटॉक’ ॲपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतात टिकटॉकचे २० कोटींहून अधिक युजर्स आहेत. आक्षेपार्ह कन्टेन्टमुळे नुकतेच टिकटॉकला रोषाला सामोरे जावे लागले आणि तात्पुरत्या बंदीनंतर टिकटॉक पुन्हा आपल्या सेवेत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर टिकटॉकने सुरक्षात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत.

टिकटॉकचा सुरक्षित वापर करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी काय केले पाहिजे? या व्यासपीठाचा वापर करणाऱ्या युजर्सची सुरक्षितता ही केवळ या ॲपची जबाबदारी आहे का? टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी खालील उपाययोजना विशेषत्वाने पालकांसाठी अधिक उपयुक्त ठरतील, जेणेकरून त्यांच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. 

वयोमर्यादा : विशिष्ट वयापेक्षा लहान मुलांना या ॲपपासून दूर ठेवण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे. टिकटॉकच्या ‘एज गेट’ या फीचरमुळे १३ वर्षांवरील लोकांनाच हे व्यासपीठ वापरण्याची; तसेच अकाऊंट तयार करण्याची मुभा आहे.

पालकांचे नियंत्रण : पालक नियंत्रण (पॅरेन्टल कन्ट्रोल) फीचरमध्ये स्क्रिन टाईम मॅनेजमेंट आणि रिस्ट्रिक्‍टेड मोड यांचा समावेश आहे. या फीचरचे नाव ‘डिजिटल वेलबीईंग’ असे असून याद्वारे पालक आपल्या मुलांच्या फोनवर ‘स्क्रिन टाईम मॅनेजमेंट’ आणि ‘रिस्ट्रिक्‍टेड मोड’ सुरू करताना त्यात पासवर्डही टाकता येतो. त्यामुळे मुले दिवसातील ठराविक वेळेतच व्हिडीओज पाहू शकतात किंवा फिल्टर्ड कन्टेन्ट पाहू शकतात.

रिस्ट्रिक्‍टेड मोड : रिस्ट्रिक्‍टेड मोडमुळे लहान मुलांसाठी अयोग्य कन्टेन्ट दिसण्यावर मर्यादा येईल. हे फीचर पासवर्डद्वारे सुरू करता येते आणि ते ३० दिवसांसाठी वैध असते. 

स्क्रिन टाईम मॅनेजमेंट : स्क्रिन टाईम मॅनेजमेंटमुळे युजर्सला किंवा त्यांच्या पालकांना वेळेची मर्यादा घालता येते. ४०,६०,९० किंवा १२० मिनिटांची मर्यादा घालता येते. वेळेची मर्यादा संपली की पुन्हा पासवर्ड टाकून टिकटॉक पाहता येते. 

धोक्‍याची सूचना देणारे टॅग : संभाव्य धोकादायक आणि साहसी व्हिडीओज असल्यास टिकटॉक अशा वेळी धोक्‍याची सूचना देणारे टॅग जोडते. त्यातून युजर्सला सतर्कतेचा इशारा देते.

कमेन्ट फिल्ट्‍रेशन : या फीचरच्या मदतीने यूजर्स ॲपवरील प्रतिक्रियांचे (कमेन्ट्‌स) व्यवस्थापन करू शकतील. आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रियांसाठी चाळणी लावता येईल. जवळपास ३० कीवर्डस निवडून त्याद्वारे कमेन्ट फिल्ट्‍रेशन करता येते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News