धोती आणि कुडता घालून अमिताभ बच्चन यांनी या भाषेत केले डेब्यू...

सागर गवई
Monday, 1 April 2019

महानायक अमिताभ बच्चन, आता  तमिळ 'उयार्न्था मनिथन' या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची नुकतीच शूटिंग सुरू झाली आहेत. 

महानायक अमिताभ बच्चन, आता तमिळ 'उयार्न्था मनिथन' या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची नुकतीच शूटिंग सुरू झाली आहेत. 

या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच पहायला मिळाली आहे.  या चित्रपटातील धोती आणि कुडता घातलेला अमिताभ यांचा  एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा चित्रपट एस. जे. सूर्य यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एस. जे. सूर्य देखील प्रमुख भूमिकेत आहेत. 

याबद्दल लिहिताना एस. जे. सूर्य यांनी लिहिले आहे, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण आहे. त्यासाठी मी भगवंतांना आणि माझ्या पालकांना कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी, एस.जे. सूर्य यांनी चित्रपट अभिनेता रजनीकांत आणि चित्रपट दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनाही शुभेच्छा दिल्या.  महानायक अमिताभ बच्चन यांना या वयामध्ये काम करतांना पाहताना आश्चर्य वाटत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News